Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणी

बोरगाव कृषी संघाच्या पदाधिकाऱ्यांची जळगाव जैन इरिगेशनला भेट

शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाण्याचे महत्व : उत्तम पाटील यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : इस्रायलच्या धर्तीवर बोरगाव परिसरातील शेतकरीही शेती करावेत. त्यासाठी त्यांना लागणाऱ्या विविध कृषी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची  माहिती मिळावी, यासाठी बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथील जैन ड्रीप इरिगेशनच्या कारखान्याला भेट दिली. त्या ठिकाणी पिकवलेली शेती, शेती …

Read More »

कर्नाटकातील पहिली कॅरोटीड आर्टरी टावी शस्त्रक्रिया ‘अरिहंत’मध्ये यशस्वी

सांगोल्याच्या ७५ वर्षीय वृद्धेला जीवदान : डॉ. एम. डी. दीक्षितसह कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक निपाणी (वार्ता) : कर्नाटकतील पहिली आणि भारतातील दुसरी कॅरोटीड आर्टरी (टावी) शस्त्रक्रिया बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली. ‘टावी’ म्हणजेच ट्रान्सकॅथेटर ॲरोटीक वॉल्व इम्प्लान्टेशन ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाची खराब झालेली …

Read More »

निपाणी तालुक्यातील दोन जण तडीपार

जिल्हा पोलीस प्रशासनाची कारवाई :अनेक गुंडांचे धाबे दणाणले निपाणी (वार्ता) : चिकोडी उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने मटका जुगार यासह गंभीर गुन्ह्यात वारंवार सहभाग असणाऱ्या दोघा जणांवर तडीपारीची कारवाई केली. यामध्ये चंद्रकांत शंकर वडर (रा.अकोळ) व संजय चंद्रकांत फराकटे (रा. जामदार प्लॉट,निपाणी) अशी तडीपार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान …

Read More »

मानव बंधुत्व वेदिकाच्या कार्यक्रमासाठी २५ हजार नागरिक येणार

माजी आमदार काकासाहेब पाटील  : जागर विचारांचा कार्यक्रमाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : मानव बंधुत्व वेदिकेतर्फे निपाणीत रविवारी (ता.६) छत्रपती शिवाजी महाराज, महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, गाडगेबाबा महाराज, यांच्यासह महापुरुषांच्या विचारांचा जागर या कार्यक्रम होणार आहे. कर्नाटक राज्य काँग्रेस प्रदेशाचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मानव …

Read More »

निपाणी ऊरूसाची तयारी पूर्णत्वाकडे

कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सरकार : चंद्र दर्शनामुळे एक दिवस ऊरुस पुढे निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरूस शनिवार (ता. ५) ते सोमवार …

Read More »

निपाणीत माकडाचा हैदोस

व्यवसायिकाचा घेतला चावा : दुकानातील साहित्याचीही नासधूस निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्याभरापासून निपाणी शहर आणि उपनगरात माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. थेट व्यवसायिकांच्या दुकानात शिरून साहित्याची नासधूस करण्यासह नागरिकांचा चावा घेत आहेत. गुरुवारी (ता.३) सकाळी तासगावकर गल्ली (नरवीर तानाजी चौक) येथील रमेश हेअर ड्रेसर्स या दुकानात शिरून माकडाने हैदोस घातला. त्याशिवाय …

Read More »

डोणगाव पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरासाठी लाखाची देणगी

  उत्तम पाटील यांनी केली सुपूर्द : मुनी महाराजांचे घेतले दर्शन निपाणी (वार्ता) : डोणगाव (जि.बुलढाणा) येथे संतशिरोमणी, आचार्य श्री १०८ विद्यासागर जी मुनी महाराज यांची कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक, युवा नेते उत्तम पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी उत्तम पाटील यांना आशीर्वाद …

Read More »

महापुरुषांचे विचार समाजात रुजले पाहिजेत

  माजी आमदार काकासाहेब पाटील: निपाणीत कार्यकर्त्यांचा मेळावा निपाणी (वार्ता) : देशात पुरोगामी चळवळ निरंतरपणे सुरू आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेवर असूड ओढणारे समाजसुधारकांना भाजप सरकार बाजूला करत आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध, यासारख्या महापुरुषांनी देशात पुरोगामी चळवळ बळकट …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत संघटनेतर्फे कारखानदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : सन २०२१-२२ गळीत हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता त्वरित द्यावा. चालू गळीत हंगामातील ऊसाचा दर जाहीर करूनच यंदाचा हंगाम सुरू करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे राज्याध्यक्ष चुनापा पुजारी, चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली कारखानदारांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, …

Read More »

महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी चळवळ

माजी मंत्री सतीश जारकीहोळी : मानव बंधुत्व वेदिकेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : देश आणि राज्यांमध्ये भाजप सरकार आल्यापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगेबाबा महाराज त्यांचे विचार संपवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून गेल्या …

Read More »