Friday , November 22 2024
Breaking News

निपाणी

जिल्ह्यातील १४०० शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर

अनेक शाळाखोल्या धोकादायक निपाणी (वार्ता) : चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पाऊस, महापूर तसेच अन्य कारणामुळे १४०० पेक्षा जास्त शाळा खोल्यांची दुरावस्था झाली आहे. येत्या पावसाळ्याच्या आत सदर खोल्या दुरुस्त कराव्यात. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी शिक्षण स्थायी समिती सदस्य …

Read More »

कोगनोळी शेतकऱ्यांचा हेस्कॉमवर मोर्चा

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी कोगनोळी : हणबरवाडी दत्तवाडी कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या वेळी या ठिकाणी असणाऱ्या उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. गेल्या महिनाभरापासून परिसरातील विद्युत पुरवठा अखंडित पणे सुरु आहे. त्यामुळे शेतीला पाणी देणे अवघड जात आहे. वीजपुरवठा …

Read More »

भिवशीतील दलित पूरग्रस्तावर अन्याय..

डॉ. आंबेडकर विचार मंच: जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या काळामध्ये अनेक कुटुंबे उध्वस्त व बेघर झालेली आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी ए. बी. व सी श्रेणीमध्ये त्याची विभागणी केली आहे. पण निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये दलित कुटुंबातील अनेक घरे पडलेली असून चुकीच्या पद्धतीने सर्वे करून सी …

Read More »

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर पुरस्कार

रावसाहेब पाटील यांची माहिती: बापूसाहेब बोरगाव यांना मरणोत्तर जीवन गौरव  निपाणी (वार्ता) : सांगलीत 14 व 15 मे रोजी होणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना तर जीवनगौरव …

Read More »

कोगनोळीजवळ ट्रकची विद्युत खांबाला धडक

सुदैवाने जीवित हानी नाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या …

Read More »

श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर राजवाड्यात देव बोलवण्याचा कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : येथे श्रीमंत सिध्दोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यामध्ये सौंदत्ती येथे रेणुका देवीचा जग, महादेवाची कावड श्रीशैल आंध्र प्रदेश इथून व श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे निपाणकर यांच्या मानाची काठी व पालखी, जोतिबाची मानाची काठी जाऊन आल्यावर सर्व देव-देवतांना एकत्र बोलवायचा कार्यक्रम राजवाडामध्ये झाला. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची

युवा नेते उत्तम पाटील : आर. ए. पाटील पब्लिक शाळेचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : कोरोना नंतरच्या काळात ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांच्या जडणघडणीत मोठा बदल दिसून येत आहे. मोबाईल अति वापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठविले की आपली जबाबदारी संपली नसून मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे …

Read More »

हत्तरवाटमधील महिलेने जन्मले तिळे!

निपाणीतील पाटील नर्सिंग होममध्ये प्रसूती : डॉ. साईनाथ पाटील यांची माहिती निपाणी (वार्ता) : आतापर्यंत बहुतांश महिलांनी तिळ्यांना जन्म दिला आहे. पण त्यापैकी काही मोजकीच अर्भके जगत असल्याच्या घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. पण निपाणी येथील कित्तूर चन्नम्मा चौकात शेजारील पाटील नर्सिंग होममध्ये एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून बालके व …

Read More »

बेनाडीच्या अमोल हजारेची मर्चंट नेव्हीमध्ये भरारी!

प्रतिकूल परिस्थितीत मिळवले यश : बेनाडी हायस्कूलचा पहिलाच विद्यार्थी निपाणी : जीवनात जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. हे बेनाडीच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अमोल अण्णासाहेब हजारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात ध्येय उराशी बाळगून  प्रयत्न केल्याने …

Read More »

रोगापासून दूर राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा

विमला कदम : ग्रामपंचायत स्वच्छता अभियान कोगनोळी : घर व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा साठवून ठेवू नका, सांड पाण्याचा योग्य निचरा करा, शौचालय स्वच्छ ठेवावे, रोगापासून दूर राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून घर व परिसर व गटार स्वच्छ ठेवावा, रोज वापरण्यात येणार्‍या प्लास्टिक व अन्य साहित्य कचरा संकलन करणार्‍या गाडीतच …

Read More »