Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

कोगनोळी येथे क्रीडा व शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोगनोळी : जायंट्स ग्रुप ऑफ कोगनोळी व मन्सूर शेंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये क्रीडा साहित्य व शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष आप्पासाहेब माने हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून कोगनोळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष जगन्नाथ खोत, उपाध्यक्ष विलास माने, पीआरओ अभिजीत चिंचणे, …

Read More »

मोहनलाल दोशी विद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार

 निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे शिक्षक आर. के. धनगर व लिपिक एस. एम. शितोळे यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  प्रकाशभाई शाह यांनी, सत्कारमूर्तींना …

Read More »

भोज क्रॉस सुशोभीकरणाचा १ कोटी ७५ लाखाचा निधी गेला कुठे?

राजेंद्र पवार यांचा आरोप : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ साखर कारखाना परिसरातील भोज – गळतगा-नेज या गावांना जोडणारा सर्वात महत्वाचा भोज क्रोस सर्कल च्या सर्वांगीण विकासाठी कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने पीडब्ल्यूडी व पीआरएएमसी योजनेतुन १ कोटी  ७५ लाखाचा भरीव निधी मंजूर करण्यात आले …

Read More »

सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून पायी दिंडी

सौंदलगा : सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यास ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला वारकरी संप्रदाय व भाविकांकडून पंचपदी म्हणण्यात आली. त्यानंतर वाहनाचे पूजन बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्री विठ्ठल मंदिरात आरती होऊन दिंडीस सुरुवात झाली. यामध्ये …

Read More »

अध्यात्मामुळे शरीर, मन स्थिर होण्यास मदत

राजू पोवार :आडी-पंढरपूरला पायी दिंडी रवाना निपाणी (वार्ता) : माणसाने दररोजच्या धावपळीत अध्यात्मासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे. अध्यात्मामुळे शरीर व मन स्थिर होण्यास मदत होते. सध्या अजूनही पावसाला सुरुवात झाली नसल्याने यंदा समाधानकारक पाऊस होऊन शेतकऱ्यांचे पीक उदंड पिकू दे यासाठी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचे सांगितले. आषाढी वारीनिमित्त आडी …

Read More »

वारकऱ्यांच्या स्नेहभोजनाची ६ वर्षाची परंपरा!

शिवाजी पठाडे यांचा उपक्रम : माऊलींच्या सेवेत भाविकही दंग निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे पंढरपूरच्या दिंड्या बंद झाल्या होत्या. यंदा हा संसर्ग कमी झाल्याने प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध भागातून दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत. खडकेवाडा येथील दिंडी निपाणी मार्गे पंढरपूरकडे दरवर्षी जात असते. यंदाही …

Read More »

सत्ताधारी गट गावच्या विकासासाठी प्रयत्नशील

पंकज पाटील : शाळा खोलीचा शुभारंभ कोगनोळी : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गट कायमपणे प्रयत्नशील आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी गटारी साफ करणे, पिण्याचे पाणी, रस्ते, विद्युत बल्ब यासह अन्य कामे करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी हालसिद्धनाथ नगर येथील सरकारी प्राथमिक शाळेतील खोली पावसामुळे कोसळली होती. यामुळे येथील विद्यार्थ्यांना धोका निर्माण …

Read More »

सीमाभागातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी

निपाणी शिवसेनेचे पत्रक : प्रसंगामध्येही सावरले राज्याला निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापत चालले आहे. तरीही सीमाभागातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे पत्रक बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब तांबे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकातील माहिती अशी, कांही स्वार्थी मंत्र्यांच्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्रास होत आहे. हिंदहृदय …

Read More »

रिक्षा अपघातातील मृताच्या वारसांना 22 लाखाची मदत

निपाणी (वार्ता) : गतवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये येथील रहिवाशी व रिक्षाचालक शैलेश मनोहर पारधे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले होते. त्या कुटुंबाच्या मदतीसाठी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी विमा कंपनीकडे दावा केला होता. त्यानुसार विमा कंपनीकडून 15 लाख 5 हजार …

Read More »

आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीतर्फे कागल एस.टी. आगारप्रमुखांना निवेदन!

कोगनोळी : आप्पाचीवाडी व हदनाळ कर्नाटक सीमाभागातील दोन्ही गावातील बरेच विद्यार्थी हे कागल येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु सध्या कागल आगाराकडून आप्पाचीवाडी-म्हाकवेमार्गे हदनाळ या गावाला ठराविक बसफेऱ्या सोडून विद्यार्थांच्या सकाळच्या कॉलेजच्या वेळेत व दुपारी परत गावाकडे येण्याच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत आहे. ही …

Read More »