खानापूर (प्रतिनिधी) : कबनाळी (ता. खानापूर) निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गाव गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतिक्षेत असल्याने नुकताच खानापूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई याना निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी कबनाळी रस्त्याबद्दल गाऱ्हाणी मांडली. …
Read More »भाजीपाला लीलाव विभागाचे प्रमुख शिवानंद राजमाने यांच्यातर्फे शिवाजी मार्केटमध्ये अनोखा सामाजिक उपक्रम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शेतकरी व भाजीपाला व्यापारी बांधवांनी दसरा व दीपावलीच्या वेळी खरेदी केलेल्या 15 नवीन वाहनांचे माजी नगरसेवक शिवानंद राजमाने यांच्या वतीने वाहन पुजन व सत्कार समारंभ पार पडला. वाहनांची उपलब्धता झाल्याने भाजीपाला शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी शिवानंद म्हणाले, बोरगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती …
Read More »रामपूर प्रिमियर लीग 2 चे उद्घाटन
मान्यवरांची उपस्थिती : सहा संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : रामपूर येथे रामपूर प्रिमियर लीग 2 चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सुमारे महिनाभर चालणार्या या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000, 3000 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिक वल्लभ देशपांडे यांच्याहस्ते यष्टीपूजन करण्यात आले. यश …
Read More »कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची एकच गर्दी
उमेदवारीसाठी अर्जाचा अखेरचा दिवस, मुदत वाढीची शक्यता बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या ईच्छुकांनी कॉंग्रेस कार्यालयात बुधवारी मोठी गर्दी केली होती. उमेदवारीसाठी अर्ज करण्याचा आज अखेरचा दिवस होता. परंतु अर्जासाठीची मुदत वाढविण्याची मागणी विचारात घेऊन मुदत वाढण्याची शक्यता कॉंग्रेस सूत्रानी दिली. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू …
Read More »खानापूर वार्ड नं. 6, घोडे गल्लीत कूपनलिका खुदाई
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर ६ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर सहाच्या नगरसेविका सौ. मिनाक्षी बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी यांच्या हस्ते मशीनला पुष्पहार घालून कूपनलिका खोदाई कामाचा शुभारंभ केला. यावेळी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी …
Read More »बालाजी नगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला
बंद घराला लक्ष्य : चोरीपूर्वी पथदीप केले बंद निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोड जवळील देवचंद कॉलेज समोर असलेल्या बालाजी नगर मधील रमेश वसंत पाटील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण तिजोरीत रक्कम अथवा दागिने नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेमुळे बालाजी नगर, संभाजीनगर …
Read More »ध्येयाशी चिकटून राहिल्यास यश मिळेल
डॉ. विलास पाटील : मगदूम वाचनालयातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : गुणवत्तेला महत्त्व आणि मरणही नाही त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी शिकले पाहिजे. कष्ट हे भांडवल आहे, डोकं चालवून कष्ट करता आले पाहिजेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड माहिती निर्माण केली आहे. त्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. शरीराच्या लाडापेक्षा त्याग करायला …
Read More »टिप्परच्या धडकेत दोन जागीच ठार
रुमेवाडी क्राॅसवरील पणजी- बेळगाव महामार्गावर घटना खानापूर : खानापूर शहराला लागून असलेल्या रूमेवाडी क्राॅसवरील पणजी- बेळगाव महामार्गावर टिप्परने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. दुसऱ्या दुचाकीवरील एकटा गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील बिडी हिंडले गावचे प्रदीप मारूती कोलकार (वय ३७) …
Read More »खानापूर नगरपंचायतीचे डेप्यूटेशनवर गेलेले कर्मचारी गो बॅक
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराची वाढती उपनगरे आणि वाढती लोकसंख्या यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात कामाचा ताण वाढला आहे. गेल्या काही वर्षापासुन खानापूर नगरपंचायतीचे सात कर्मचारी डेप्यूटेशनवर गेलेले होते. त्यांना गो बॅक करून खानापूर नगरपंचायतीच्या कार्यालयात हजर करावे,अशा मागणीचे निवेदन खानापूर नगरपंचायतीचे स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव …
Read More »वेदगंगा, दूधगंगा नदीतील थेंबही पाणी देणार नाही
राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta