Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर तालुक्यातील ‘ती’ गावे इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळा

  खानापूर तालुका म. ए. समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील संबंधित 62 गावे इको सेन्सिटिव्ह झोनच्या कक्षेतून वगळण्यात यावीत. त्याचप्रमाणे या झोन संबंधी आक्षेप नोंदवण्यासाठीची 60 दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे. …

Read More »

खानापूरच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतर डॉ. सरनोबत यांच्या प्रयत्नाने गावोगावी रेशन वाटप

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या दुर्गम भागात 75 वर्षानंतरही गावोगावी रेशन वाटप केले जात नव्हते. ही भाजप नेत्या व भाजप महिला मोर्चा व्हाईस प्रेसिडेंट डॉ. सोनाली सरनोबत यांच्या खानापूर येथील तक्रार निवारण कार्यालयात दुर्गम भागातील 23 गावांनी तक्रार नोंदविली. याची दखल घेऊन जुलै …

Read More »

राजकुमार टाकळे यांचा काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर पलटवार

  बेळगाव : हिंदू कायद्यानुसार दुसरे लग्न होऊ शकत नाही, मी तिच्याशी लग्न केलेले नाही, असे म्हणत फलोत्पादन खात्याचे अधिकारी राजकुमार टाकळे हे माझे पती आहेत, असा नवा बॉम्ब फोडणार्‍या काँग्रेस नेत्या नव्यश्रीवर राजकुमार टाकळे यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस नेत्या नव्यश्री यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणारे उद्यान विभागाचे अधिकारी …

Read More »

संकेश्वरातील श्रीराम मंदिराला खासदारांकडून ५ लाख रुपयांचा निधी मंजूर

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हौसिंग काॅलनीत श्रीराम मंदिर निर्माणचे काम केले जात आहे. चिकोडी लोकसभा मतक्षेत्राचे खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांनी धर्मादाय खात्यातून पाच लाख रुपयांचा निधी हौसिंग काॅलनीतील श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कामासाठी मंजूर केला आहे. मंजुरी पत्राचे हस्तांतरण खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले यांचे आप्तसचिव संतोष सिंगने यांनी आज श्रीराम मंदिर …

Read More »

रोहिणी पेरा, मोत्यांचा तुरा.. गेले ते दिवस…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : रोहिणी पेरा, मोत्याचा तुरा… सांगण्याचे दिवस मागे पडल्याने शेतकरी निसर्गाच्या बदलाचा स्विकार करीत खरीप आणि रब्बी पिके घेतांना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्र काळात खरीपाची पेरणी करण्याचे भाग्य लाभलेले नाही. यंदा तर शेतकऱ्यांना खरीपाची पेरणी आद्रा नक्षत्र काळात करावी लागली आहे. रोहिणी …

Read More »

संकेश्वर पालिका डासांचा नायनाट करण्यासाठी पुढे सरसावली!

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका डेंग्यू मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात फाॅगिंग मशीनने औषध फवारणीचे कार्य करताना दिसत आहे. आज प्रभाग क्रमांक ५ मधून फाॅंगिंग कार्याचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारखे आजार बळावतात. हे आजार टाळण्यासाठी संकेश्वर पालिका डासांचा …

Read More »

इको सेन्सिटिव्ह झोन बैठकीत आ. डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

  बेंगळुरू : भारत सरकारने 15 राज्यांमधील एकूण 56.825 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश म्हणून अधिसूचित केला आहे. या अधिसूचनेवर चर्चा करण्यासाठी काल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खानापूरच्या आमदार डॉ. निंबाळकर यांनीही या बैठकीत सहभागी होऊन सूचना मांडल्या. पश्चिम घाट प्रदेशातील लोकांचे जीवन सुसह्य …

Read More »

बेनाडी भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे सत्कार समारंभ

  बेनाडी (वार्ता) : येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे निवडीनिमित्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शंकर जनवाडे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे सचिव विजय वाडकर यांनी स्वागत केले. त्यानंतर संचालक एम. बी. जनवाडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचे संचालक आणि बेनाडी येथील रहिवाशी संजय तावदारे यांची सांगली येथील …

Read More »

कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या निपाणी तालुका महिला शाखेचे उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या निपाणी तालुका महिला शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्यदलित संघर्ष समितीचे राज्य संचालक परशुराम निलनायक होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते निपाणी नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुन्सिपल हायस्कूल मैदानावर …

Read More »

घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण मिळेल : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

  मराठा समाज विकास प्राधिकरण कार्यालयाचे शानदार उद्घाटन बेंगळूरू : स्वातंत्र्य संग्रामात मराठा समाजाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. छत्रपती शिवरायांनी राष्ट्राच्या हितासाठी आपले कार्य केले अशा मराठा समाजाने आपल्या जीवनात नेहमीच मोठी साथ दिली आहे. या समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी सातत्याने केली जात आहे. घटनेच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण निश्चितच …

Read More »