Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघामध्ये सहकार सप्ताह

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघात 69 वा सहकार सप्ताह प्रारंभ. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर व्हा. चेअरमन डॉ. संजय आडसूळ यांनी ध्वज पूजन करून, ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना संघाचे विद्यमान चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, तारीख 14 पासून सहकार …

Read More »

सौंदलगा हायस्कूलला आजी-माजी सैनिकांकडून देणगी

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेला सौंदलगा व भिवशी येथील आजी-माजी सैनिक संघटनेकडून देणगी देण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षक एस. व्ही. यादव यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चेअरमन रघुनाथ चौगुले हे होते. यावेळी माजी मुख्याध्यापक एस. डी. पाटील …

Read More »

बुधवारच्या सामन्यात बालगोपाल संघ विजयी

अरिहंत चषक फुटबॉल स्पर्धा : युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘अरिहंत चषक’ या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत बुधवारी (ता. १६) बालगोपाल विरुद्ध गडहिंग्लज सिटी यांच्यात पहिलासामना झाला. त्यामध्ये …

Read More »

कबनाळी रस्त्याची दुरावस्था; मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : कबनाळी (ता. खानापूर) निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गाव गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतिक्षेत असल्याने नुकताच खानापूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई याना निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच निलावडे ग्राम पंचायत उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी कबनाळी रस्त्याबद्दल गाऱ्हाणी मांडली. …

Read More »

भाजीपाला लीलाव विभागाचे प्रमुख शिवानंद राजमाने यांच्यातर्फे शिवाजी मार्केटमध्ये अनोखा सामाजिक उपक्रम

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शेतकरी व भाजीपाला व्यापारी बांधवांनी दसरा व दीपावलीच्या वेळी खरेदी केलेल्या 15 नवीन वाहनांचे माजी नगरसेवक शिवानंद राजमाने यांच्या वतीने वाहन पुजन व सत्कार समारंभ पार पडला. वाहनांची उपलब्धता झाल्याने भाजीपाला शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी शिवानंद म्हणाले, बोरगाव येथील शेतकरी बांधवांच्या शेती …

Read More »

रामपूर प्रिमियर लीग 2 चे उद्घाटन

  मान्यवरांची उपस्थिती : सहा संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : रामपूर येथे रामपूर प्रिमियर लीग 2 चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सुमारे महिनाभर चालणार्‍या या स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे. विजेत्यांना अनुक्रमे 7000, 5000, 3000 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिक वल्लभ देशपांडे यांच्याहस्ते यष्टीपूजन करण्यात आले. यश …

Read More »

कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची एकच गर्दी

  उमेदवारीसाठी अर्जाचा अखेरचा दिवस, मुदत वाढीची शक्यता बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या ईच्छुकांनी कॉंग्रेस कार्यालयात बुधवारी मोठी गर्दी केली होती. उमेदवारीसाठी अर्ज करण्याचा आज अखेरचा दिवस होता. परंतु अर्जासाठीची मुदत वाढविण्याची मागणी विचारात घेऊन मुदत वाढण्याची शक्यता कॉंग्रेस सूत्रानी दिली. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा सुरू …

Read More »

खानापूर वार्ड नं. 6, घोडे गल्लीत कूपनलिका खुदाई

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर ६ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर सहाच्या नगरसेविका सौ. मिनाक्षी बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी यांच्या हस्ते मशीनला पुष्पहार घालून कूपनलिका खोदाई कामाचा शुभारंभ केला. यावेळी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी …

Read More »

बालाजी नगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

बंद घराला लक्ष्य : चोरीपूर्वी पथदीप केले बंद निपाणी (वार्ता) : येथील मुरगुड रोड जवळील देवचंद कॉलेज समोर असलेल्या बालाजी नगर मधील रमेश वसंत पाटील त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. पण तिजोरीत रक्कम अथवा दागिने नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. या घटनेमुळे बालाजी नगर, संभाजीनगर …

Read More »

ध्येयाशी चिकटून राहिल्यास यश मिळेल

डॉ. विलास पाटील : मगदूम वाचनालयातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : गुणवत्तेला महत्त्व आणि मरणही नाही त्यामुळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठी शिकले पाहिजे. कष्ट हे भांडवल आहे, डोकं चालवून कष्ट करता आले पाहिजेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड माहिती निर्माण केली आहे. त्याचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. शरीराच्या लाडापेक्षा त्याग करायला …

Read More »