Saturday , June 6 2026
Breaking News

बोरगाव नगरपंचायतीचा ११ कोटी ६७ लाखाचा अर्थसंकल्प सादर

Spread the love
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायतीचा सन २०२३-२४ सालाचा अंतिम सुधारित ११ कोटी ६७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आले. यामध्ये ७१ हजार ८२२ रुपये शिलकीचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पामध्ये शहरातील रस्ते, गटारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, उद्याने, घनकचरा प्रकल्प यासह मूलभूत सुविधांना प्राधान्य दिली असल्याचे दिसून आले. तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी  अर्थसंकल्प सादर केला. तरतूद करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्मचारी पगार, पथदीप, घनकचरा
प्रकल्प, पाणीपुरवठा उद्यान निर्मिती व मागासवर्गीय कल्याण
निधी असे मिळून एकूण २ कोटी १८ लाख ८८ हजार रुपयांचा, तसेच पंधरावा वितआयोग, एसएमसी अनुदान, वॉटर स्केअर सिटी, एसएससी मुक्त निधी, तसेच इतरे अनुदानातून ७ कोटी ४७ लाख ६० हजार व विशेष पावती मधून विविध योजनांसाठी २ कोटी ३७ हजार  असे एकूण ११ कोटी ६६ लाख ८६ हजार  रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सादर करण्यात आला. तर उत्पन्नातून शासनाकडून कर्मचारी येणारे वेतन, एसएससी मुक्त निधी, व्यापारी गाळ्याचे भाडे, इमारत बांधकाम परवानगी, कर व्यापार परवानगी फी, टेंडर विक्री व स्क्रॅप विक्री, दोन पाणी पट्टी व घरफळा विद्युत ग्रँट असे एकूण २ कोटी ७२ लाख  ४० हजार,१५ वा वित्त आयोग, विशेष अनुदान, वॉटर स्कॅरसाईटी व इतर उत्पन्नातून ६ कोटी ९४ लाख ८० हजार रुपये, तसेच विविध वसुली व योजनेतून २ कोटी ३७ हजार रुपये असे एकूण ११ कोटी ६७ लाख, ५७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगरपंचायतीचा ७१ हजार ८२२ रुपयांचा शिलकी अंदाजपत्रकजाहीर करण्यात आले आहे. अर्थसंकल्पमधून बोरगाव शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी घर व पाणी कर भरून शहराच्या विकासाला चालना द्यावी. अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता यासह विविध कामांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे. अधिक महसूल जमा झाल्यासशहराचा विकास झपाट्याने होत असतो त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे यावेळी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्याधिकारी प्रसन्ना कल्याणशेट्टी, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडीयनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, वसुली सहाय्यक जयपाल नेजे, अकाउंट विभागाचे जी. एच, जमाल उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सायकलच्या चाकाला ‘महागाईचा ब्रेक’; जानेवारीपासून चौथ्यांदा दरवाढ

Spread the love  स्पेअरपार्टच्या लहान कंपन्या अडचणीत निपाणी (वार्ता) : इंधन दरवाढ होण्यासह आरोग्यासाठी सायकल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *