बेळगाव : बेळगावच्या गणाचारी गल्लीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. आकाश सुनील परीट असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणाचारी गल्लीत गांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान 176 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि 14,200 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.
Read More »दहावी परीक्षेस उद्यापासून प्रारंभ
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची मानल्या दहावीच्या परीक्षेला सोमवार (ता. २५) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली असून रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक घालण्याचे काम पूर्ण केले जाणार असून रंगपंचमी दिवशी दहावीचा पहिला पेपर पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर …
Read More »समिती विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार; रणजित चव्हाण -पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड
बेळगाव : शहर समितीच्या विस्तारामुळे सीमालढ्याला बळकटी मिळणार असून नवीन युवा कार्यकर्ते लढ्यासोबत जोडले जात आहेत. त्यामुळे समितीला बळकटी प्राप्त होत आहे, असे विचार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीची बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. महादेव पाटील यांनी प्रास्तविकात, सीमालढ्यात …
Read More »भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून दोघा जणांचा मृत्यू
बेळगाव : भरधाव मोटारसायकल दुभाजकाला आदळून मोटारसायकलवरून खाली पडल्याने दोघा जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री पहिल्या रेल्वेगेटजवळ ही घटना घडली असून शनिवारी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. ऍड. अभिषेक मुत्ताप्पा कित्तूर (वय ३२) रा. राणी चन्नम्मानगर व किरण रमेश अळगुंडी (वय २३) रा. गोकाक …
Read More »होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर-तालुक्यात दोन दिवस दारूबंदी
बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. बेळगाव शहर व उपनगरात रविवार दि. २४ मार्चच्या दुपारी २ पासून सोमवारी २५ मार्चच्या मध्यरात्री ११.५९ पर्यंत वाईन शॉप, …
Read More »मंदिरे, मशिदी, प्रार्थनास्थळावर निवडणूक प्रचारास निर्बंध
बेळगाव : भारतीय निवडणूक आयोग सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित करणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, 16 मार्च 2024 पासून राज्यभरात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संदर्भात, कोणतेही राजकीय पक्ष आणि मंदिरे, चर्च, मशीद आणि प्रार्थनास्थळांशी संबंधित प्रशासकीय संस्था किंवा प्रमुख मंदिरे/चर्च/मशीद आणि प्रार्थनास्थळांमध्ये निवडणुकीशी …
Read More »शास्त्रीनगरातील श्री गणेश मंदिर सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी कार्यक्रम बांधकामाचा श्रीगणेशा
किरण जाधव यांच्या हस्ते केले गेले भूमिपूजन बेळगाव : शास्त्रीनगर, बेळगाव येथील श्री गणेश मंदिरा समोरील खुल्या जागेत सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी करण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव …
Read More »अटकेच्या विरोधात शुभम शेळके यांच्याकडून पोलिस प्रशासनाला नोटीस
बेळगाव : आनंदवाडी कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी “जय महाराष्ट्र” म्हणण्यास विरोध केला होता त्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध स्तरातून त्या घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला होता. त्याचवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी देखील त्या उद्योजकाचा निषेध नोंदवला होता. …
Read More »…चक्क एक माजी महापौर राबवित आहेत सह्यांची मोहीम!
(६) बेळगाव : निवडणुका येती घरा तोची दिवाळी दसरा… अशी काहीशी गत सध्या समाजामध्ये निर्माण झाली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सामान्य जनता फक्त राजकारणात अडकून पडली आहे आणि याचाच फायदा नेते मंडळी करून घेताना दिसतात. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विशेषतः बेळगाव लोकसभा मतदारसंघात …
Read More »विद्याभारती जिल्हास्तरीय बैठक उद्या
बेळगाव तारीख 22 अनगोळ येथील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा विद्याभारती वार्षिक योजना बैठकीचे आयोजन शनिवार तारीख 23 रोजी सकाळी 10.00 वाजता शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, उमेश कुमार, वसंत माधव हे जिल्ह्यातील विविध शालेय मुख्याध्यापक शिक्षक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta