Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना फळे वाटप

  बेळगाव : येथील राष्ट्रीय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते कृष्णगौडा पाटील यांनी रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना फळांचे वाटप केले व त्यांच्या प्रक्रुतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. समाजसेवेच्या भावनेतून पाटील यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

Read More »

मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक : अभियंते हणमंत कुगजी

  येळ्ळूर : मराठी भाषा सुंदर व समृद्ध आहे, तसेच तिचा गोडवाही तितकाच आहे, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व ती भाषा समृद्ध करण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे विचार अभियंते व अशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक हणमंत कुगजी यांनी काढले. ते येळ्ळूर …

Read More »

श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा

  बेळगाव : 27 फेब्रुवारी कवी वी. वा. शिरवाडकर यांच्या जन्म दिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो बापट गल्लीतील श्री कालिका देवी युवक मंडळाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा दिन साजरा केला जातो गल्लीतील पांच श्री. गोपाळराव केसरकर यांच्या हस्ते कवी वी. वा शिरवाडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. …

Read More »

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी

  मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा दिन साजरा बेळगाव : मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे एका ठरावाद्वारे करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. पत्रकार संघातर्फे मंगळवारी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ही …

Read More »

गीतराधाई उत्सवशाही या सांस्कृतिक कार्यक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातु मूर्ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी रविवार (ता. 25) रोजी रात्री दहा वाजता सादर झालेल्या गीतराधाई उत्सवशाही या सांस्कृतिक मराठमोळ्या कार्यक्रमाने येळळूरवासिय जनतेची मने जिंकली, मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहास सांगणाऱ्या या …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने उद्या मराठी भाषा दिन

  बेळगाव : येणाऱ्या दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आपण सर्व मराठीप्रेमी कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करणार आहोत. या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समग्र स्थितीगतीचा आढावा घेऊन तिच्या विकासाच्या दिशा निश्चित करण्यासाठी चर्चा आणि चिंतन आवश्यक आहे. मराठी भाषेची सद्यःस्थिती, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यातील …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन….

  बेळगाव : गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 27 फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 5.00 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.. यावर्षी प्रबोधिनीतर्फे साजरा केला जाणारा हा 25 वा मराठी भाषा गौरव दिवस आहे. या निमित्ताने कोल्हापूर …

Read More »

कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीराम सेनेचे आंदोलन

  बेळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंडलगा कारागृहासमोर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यास मज्जाव करणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ श्रीराम सेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. दरवर्षी प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज 26 फेब्रुवारी रोजी श्री राम सेना प्रमुख तसेच कार्यकर्ते हिंडलगा कारागृह …

Read More »

डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असो. सरचिटणीस पदी सुनील जाधव अविरोध

  बेळगाव :बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर असोसिएशनच्या सरचिटणीस पदी सुनील विजयानंद जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहित असोसिएशचे अध्यक्ष राम बदरगडे यांनी दिली. बेळगाव क्लब रोड येथील इफा हॉटेल येथे सदर निवड प्रक्रिया पार पडली. बेळगाव जिल्ह्यातील 3 हजारहून अधिक डिजिटल ऑन लाईन सेंटर्स उपरोक्त संघटनेचे …

Read More »

क्रेडाईच्या बेल्कॉन व ऑटो एक्स्पोचा रविवारी रात्री समारोप

  बेळगाव : “जसे भगवान विश्वकर्मा हे जगाचे आर्किटेक्ट होते तसेच बांधकाम व्यावसायिक हे सुद्धा आजचे विश्वकर्माच आहेत. मानवाच्या तीन प्रमुख गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या असल्या तरीसुद्धा अन्न हे काही तासाचा आनंद देणारे, वस्त्र हे काही महिने आनंद देणारे तर घर हे अनेक वर्षे आणि काही वेळा पिढ्यानपिढ्या …

Read More »