Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

किरण जाधव यांच्या हितचिंतकांना आवाहन

  बेळगाव : उद्या गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांचा 49 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सदर जन्मदिन सोहळ्यानिमित्त न्यू गुडशेड रोड येथील किरण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत किरण जाधव हे उपस्थित राहून शुभेच्छा …

Read More »

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा ग्रामस्थांकडून नारळ फोडून निषेध!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होनीहाळ गावामध्ये आज बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना ग्रामस्थांच्या एका गटाकडून विरोधाचा सामना करावा लागला. रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आ. लक्ष्मी हेब्बाळकर गावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना भाजप समर्थक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने मिक्सर देण्याचा आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घाट घातला. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.

Read More »

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या मळ्याला आग

  सांबरा : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकरात पिकवलेला सुमारे ९ टन ऊस जळून भस्मसात झाला. आज बुधवारी सांबरा (ता. बेळगाव) येथील शिवारात ही घटना घडली. सुनील देसाई व धनंजय देसाई अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेत सदर शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच मारीहाळ …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले….

  बेळगाव : रेणुका देवी सौंदत्ती (यल्लम्मा) यात्रा संपून येळ्ळूरचे भाविक गावाच्या बाहेर मळ्यातील हणमंत गौड नगर येथे यात्रा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी जो काही कचरा निर्माण होतो त्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीने यात्रे ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला कचरा जमा करण्यासाठी कचरा पिशवीची व्यवस्था केले होती. भाविकांना आवाहन केले होते की, …

Read More »

साहित्य संमेलनातून भाषा संवर्धनाचे काम : पी. एच. पाटील

  कुद्रेमानी साहित्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोपण कुद्रेमानी : सीमाभागातील साहित्य संमेलनांतून मराठी जागर केला जातो. प्रतिकूल परिस्थितीत मराठी संवर्धनाचे काम सुरू असून यातून मराठी भाषा, संस्कृतीचा प्रसार होत असल्याचे मत कुद्रेमानी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी येथे 15 रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलन मंडपाची मुहुर्तमेढ रोपण …

Read More »

किल्ला रेणुका देवी यात्रेत किरण जाधव यांचा सहभाग

  बेळगाव : श्री रेणुका देवी यात्रेहून परत आलेल्या भक्तांकडून किल्ला येथे पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भाजप नेते किरण जाधव यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतला. नवगोबा यात्रेचा भाग म्हणून किल्ला येथे पडल्या भरणे कार्यक्रम पार पडला.

Read More »

अनुवाद कलेमुळे अनेक भाषा जवळ आल्या : डॉ. गिरजाशंकर माने

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात विश्व हिंदी दिवसाच्या निमित्ताने अल्पावधी पाठ्यक्रमाच्या अंतर्गत अनुवाद विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी हिंदी विभागातर्फे “अनुवाद का महत्व” या विषयावर संगोळी रायण्णा सरकारी पदवी महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. गिरजाशंकर माने यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. …

Read More »

बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणुकीला ग्रीन सिग्नल

  बेळगाव : अखेर बेळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीला राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाच्या अधिन सचिवांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना 9 तारखेला पत्र दिले. 21 व्या कार्यकाळासाठी शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणानुसारच, नियमानुसार निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यानुसार बेळगाव महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी …

Read More »

रिंग रोड विरोधात म. ए. समिती शिष्टमंडळाची धारवाड कार्यालयाला धडक

  बेळगाव : रिंग रोडसाठी बेळगावमधील १३०० एकर सुपीक जमीन हडप करण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांसह स्थानिक जनतेचा प्रखर विरोध आहे. मात्र हा विरोध डावलुनही नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने नोटीस पाठविली असून याविरोधात आज मंगळवारी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने धारवाड येथील नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात भेट दिली. माजी आमदार आणि तालुका …

Read More »