Monday , July 27 2026
Breaking News

बेळगाव

मराठी फलक असतील तिथेच व्यवहार करा; मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ठराव

  बेळगाव : मराठी फलकांवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासन व कन्नड दुराभिमान्यांना जशात तसे उत्तर देण्यासाठी मराठी फलक असतील त्या ठिकाणीच व्यवहार करावेत, असा ठराव गुरुवारी (दि. ४) मराठा मंदिरात झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रशासनाच्या कानडीकरणाच्या फतव्याचा निषेध करण्यात आला. …

Read More »

महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय मदत कक्षातून सीमावासीयांना अर्थसहाय्य देण्यास प्रारंभ करण्यात आला असून, येथील एका भगिनीला उपचारांसाठी निधी देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बेळगावात मराठा मंदिर सभागृहात आज, गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय …

Read More »

गायिका अंतरा कुलकर्णीची श्री समादेवी मंदिराला भेट

  बेळगाव : बेळगावची कन्या आणि संपूर्ण जगात पाहत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोची उपविजेती अंतरा कुलकर्णी हिने दर्जेदार गाण्यांची मालिका सादर करत उपविजेतेपदाचा मान पटकाविला. या स्पर्धेतील उपविजेती अंतरा उमेश कुलकर्णी हिने बुधवारी समादेवी गल्लीतील श्री. समादेवी मंदिरला भेट देऊन दर्शन घेऊन आशीर्वाद …

Read More »

संत मीरा शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून एकलव्य पुरस्कार विजेते मिस्टर इंडिया शरीरसौष्ठवपटू प्रीतम चौगुले प्यारा ‌ऑलपियानपदक विजेते संजीव हम्मंण्णावर, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते …

Read More »

तालुका समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी

  बेळगाव : पहिल्या स्त्री शिक्षिका, आद्य समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः आपल्या पत्नीला शिक्षण देऊन नंतर समाजामध्ये पुण्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा काढून या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षिका म्हणून रुजू केले होते. तेव्हापासून स्त्री शिक्षणाला सुरुवात …

Read More »

पत्नीचा खासगी व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणारा पती पोलिसांच्या ताब्यात

  बेळगाव : पत्नीला घटस्फोट न दिल्यास अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करू, अशी धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची घटना बेळगाव शहरात घडली आहे. शहरातील रहिवासी असलेल्या किरण पाटील याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला असून तो दुसऱ्या महिलेशी लग्न करणार होता. तसेच, खासगी क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची …

Read More »

मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 28, 29 व 30 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्राथमिक विभाग स्नेहसंमेलन दि. 28 डिसेंबर रोजी बालवाडी ते 3री इयत्तांचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्यातील उपक्रमाशील शिक्षक श्री. मोहन पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची …

Read More »

बेळगावात अंगणवाडी मदतनीस महिलेवर हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावातील अंगणवाडी मदतनीस सुगंधा मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यात महिलांना संरक्षण मिळत नसल्याचा संताप निदर्शकांनी व्यक्त केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे नेते जी. एम. जैनेखान यांनी सांगितले की, …

Read More »

पिरनवाडी नगर पंचायतीला ग्रामस्थांचा घेराव

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी नगर पंचायतीकडून मालमत्तांचे कॉम्युटर उतारे देण्यासाठी रहिवाशांकडून हजारो रुपये उकलण्यात येत असल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी आज नगरपंचायतीला घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला. बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी ग्राम पंचायतीचा दर्जा वाढवून नगरपंचायतीचा दर्जा दोन वर्षांपूर्वी देण्यात आलाय. मात्र नगरपंचायत झाल्यापासून रहिवाशांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यात वाढच झाल्याचा …

Read More »

आधुनिकते बरोबर नैतिकतेचा वारसा जपा : डॉ. सरिता मोटराचे

  बेळगाव : बेळगांव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालिका दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला.मजगांव येथील एस.एन.के. पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मराठी प्राध्यापिका डॉ. सविता मोटराचे या प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी भूषविले …

Read More »