Sunday , July 26 2026
Breaking News

‘बेळगाव रन’ मॅरेथॉनच्या पोस्टरचे अनावरण

Spread the love

 

बेळगाव : आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांची भेट घेण्यात आली. याप्रसंगी आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनचे सुनील आपटेकर यांनी मॅरेथॉन स्पर्धेबाबत सविस्तर माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांना दिली.
पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात प्रमुख पाहुणे पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांच्या हस्ते आपटेकर स्पोर्टस् फाउंडेशनच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘बेळगाव रन’ मॅरेथॉन स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.
याडा मार्टिन यांनी मॅरेथॉनसह क्रीडा प्रकारांत सुनील आपटेकर यांनी क्रीडा क्षेत्रात देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले. भविष्यात बेळगाव जिल्ह्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यास ही पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विकास कलघटगी, मल्लेश चौगुले, संभाजी पवळे, अनिल अंबरोळे व फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *