Monday , September 21 2026
Breaking News

श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकमान्य टिळक गणेश महामंडळाच्या मागणीनुसार मिरवणूक मार्गावरील विविध चौकात लोंबकळत असलेल्या विद्युत तारांची शुक्रवारी सकाळी शहर अभियंता संजीव हमन्वर यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, गिरीष धोंगडी, सुनिल जाधव उपस्थित होते.

सकाळी विविध भागातील मंडप उभारणी जागेची व मिरवणूक मार्गवर लोंबकळत असलेल्या विद्युत तारा, संदर्भात लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सुनील जाधव यांनी मंडळ पदाधिकार्‍यांच्या सूचनांचा विचार हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना कुमार गंधर्व येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. त्यानुसार 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सवात कोणतीही विद्युत समस्या वा अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शुक्रवारी हेस्कॉमचे शहर अभियंता संजीव हमन्वर यांनी नियोजनाची दिशा ठरवली.

हेस्कॉमचे शहर अभियंता संजीव हमन्वर, सेक्शन अभियंता सय्यद विद्युत वितरण, कर्मचारी सीताराम सरनोबत, रवी चलवादी, तसेच अन्य विद्युत कर्मचारी व लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, सुनील जाधव, रवी कलघटगी यांसह गणेशोत्सव मंडळ पदाधिकार्‍यांच्या उपस्थित विविध भागातून पाहणी दौरा करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *