Wednesday , March 26 2025
Breaking News

धर्मवीर चौकातील आंदोलन प्रकरणी राज्यद्रोह खटल्यातून ४० जणांना वगळले

Spread the love

 

बेळगाव : धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केल्याप्रकरणी राज्यद्रोह व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या ५५ पैकी ४० जणांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील शिवप्रेमींनी २०१९ मध्ये धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले होते. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी ५५ जणांविरोधात राज्यद्रोह व इतर प्रकारचे खटले दाखल केले होते. मात्र, हे गुन्हे खोटे असून संबंधितांना या खटल्यातून संशयितांना वगळण्याची मागणी ऍड. राम घोरपडे आणि ऍड. पल्लवी पालेकर यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात एका याचिकेद्वारे केली होती. त्याचा विचार करुन न्यायालयाने ४० जणांना या खटल्यातून वगळले आहे.

बळवंत रामा शिंदोळकर, नरेश राजू निलजकर, मेघराज रवळनाथ गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील प्रकाश लोहार, नागेश हणमंत काशिलकर, रोहित महादेव माळवी, शुभम विजय सुतार, शुभम राहुल बांदेडकर, सागर बंडू केरवाडकर, विनायक संजय सुतार, श्रेयस सुहास खटावकर, गजानन ज्योतिबा जाधव, विनायक परशुराम कोकितकर, दयानंद दत्ता बडसकर, सूरज सुभाष गायकवाड, राहुल मदन बरळे, गौरंग जगनाथ गेंजी, रत्नप्रसाद लक्ष्मण पवार, माजी महापौर सरिता विराज पाटील, लोकनाथ जयशिंग राजपूत, सुदेश परशुराम बकरीमंडी, राहुल रमेश सावंत, श्रीधर दिलीप गेंजी, विक्की प्रकाश मंडोळकर, सूरज रामा शिंदोळकर, भालचंद्र दत्त बडस्कर, विनायक रवींद्र हुलजी, हरीश प्रेमकुमार मुतगेकर, भरत लक्ष्मण मेस्सी, बागेश बाळाराम नंद्याळकर, हृतिक तानाजी पाटील, राजेंद्र गौतम बैलूर, विश्वनाथ रवी घोटाडकी यांचा सहभाग आहे.

पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे निराधार व खोटारडे आहेत. शिवप्रेमी व समिती कार्यकर्त्यांना विनाकारण यामध्ये गोवण्यात आले आहे. असा दावा ऍड. घोरपडे व ऍड. पालेकर यांनी उच्च न्यायालयात केला होता.

यापूर्वी ऍड. अमर येळ्ळूरकर यांना या खटल्यातून वगळण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा ४० जणांना या खटल्यातून वगळण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

इंद्रप्रस्थ नगर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : इंद्रप्रस्थ नगर येथील एका अपार्टमेंट परिसरात सकाळी ५:३० वाजता भटक्या …

One comment

  1. sangeeta Ajarekar

    ।। श्रीगणेशा ।।

    तुझ्या कृपेने, तूझ्या आगमनापूर्वीची तयारी सर्व जिम्मेदार व्यक्तींकडून सुरळीत होवून भविष्यात कोणतीहि अनुचित घटना घडू नये.

    असा तुझा अशिर्वाद सर्व भविष्यात राहू दे।

    हि नमस्कार ची तुझ्या चरणी विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *