Monday , September 21 2026
Breaking News

कोनेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

Spread the love

 

बेळगाव : शेतात काम करत असताना थेट खराब झालेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी गावच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 10 रोजी घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, भरमा पावशे हे आपल्या पत्नीसह शेतात काम करत होते. पण अनावधानाने त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाल्याचे लक्षात आल्याने त्यांच्या पत्नीने लाकडी काठीने विद्युत तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण आधीच ते मृत्युमुखी पडले होते. पावसाळ्यात होणाऱ्या अश्या घटना विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडत असतात. घराचा प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे कोनेवाडी गावातील तसेच इतर शेतकरी समुदायाला धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा (परशराम पावशे), सून (अनिता पावशे) आणि 2 नातू (जोतिबा आणि विनायक) आहेत. कष्टाळू सुस्वभावी आणि मनमिळाऊ असलेल्या पावशे यांच्या अकाली जाण्याने कोनेवाडी परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *