Sunday , July 26 2026
Breaking News

14 ऑगस्ट रोजी “अखंड हिंदुस्थान संकल्प दिन”; शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील यांची उपस्थिती

Spread the love

 

 

बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे -पाटील हे येत्या बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. या दिवशी रात्री 8 वाजता श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावतर्फे आयोजित अखंड हिंदुस्थान संकल्प दिन सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे/वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे 14 ऑगस्ट रोजी शहरातील टिळक चौक येथे अखंड हिंदुस्थान संकल्प दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते असलेले नितीन बानुगडे-पाटील हे शिवव्याख्याते म्हणून सुपरिचित असून बऱ्याच वर्षानंतर त्यांचा बेळगावात कार्यक्रम होत आहे. श्रीराम सेना हिंदुस्थानने ‘चलो टिळक चौक’ अशी हाक दिल्यामुळे बानुगडे -पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी टिळक चौकात मराठी भाषिकांसह देशप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *