Sunday , September 20 2026
Breaking News

भाजपमधील असंतोष नेत्यांची बेळगावमध्ये गुप्त बैठक!

Spread the love

 

बेळगाव : भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाला उघडपणे विरोध करणारे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ आणि आमदार रमेश जारकीहोळी यांनी पक्षातील कांही नाराज नेत्यांना एकत्र घेऊन बेळगावातील एका खासगी हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

विजयेंद्र यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद दिल्याबद्दल भाजपच्या काही नेत्यांनी हायकमांडकडे विरोध दर्शवला होता. यानंतर बेळगावात बैठक घेऊन नाराज नेत्यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावण्याची तयारी चालवली आहे. सदर गुप्त बैठकीला बसनगौडा पाटील यत्नाळ, रमेश जारकीहोळी, कुमार बंगारप्पा, प्रताप सिन्हा, जीएम सिद्धेश्वर, अण्णासाहेब जोल्ले आदी सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुडा घोटाळ्याविरोधात विजयेंद्र यांनी काढलेला मोर्चा यशस्वी झाला असला तरी नाराज नेत्यांची बैठक महत्त्वाची ठरली आहे. पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत वाद सुरू झाला असून, आता पुढे कोणता मार्ग निघतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *