Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

उषाताई गोगटे कन्या विद्यालयात इंट्रॅक्ट क्लब पुनर्रचना

  बेळगाव : बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात सन 2022-23 वर्षासाठी इंट्रॅक्ट क्लबची पुनर्रचना शनिवार 23 जुलै रोजी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे पूर्व अध्यक्ष ऍड. सचिन बीचू उपस्थित राहून इंट्रॅक्ट क्लब च्या पदाधिकाऱ्यांना ब्याच वितरण करुन अधिकार प्रदान करून विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. इंट्रॅक्ट क्लब …

Read More »

खिळेगाव-बसवेश्वर योजना पूर्ण करणारच

आमदार श्रीमंत पाटील यांचा विश्वास : मतदार संघात हजारो कोटींची रस्ता कामे कागवाड : कागवाड मतदारसंघातील उत्तर भागातील हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा खिळेगाव- बसवेश्वर पाणीपुरवठा प्रकल्प कोणत्याही स्थितीत पूर्ण करणारच, असा विश्वास माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. कागवाड मतदारसंघातील महाराष्ट्र हद्दीला लागून असलेले अरळीहट्टी-शिरूर, मदभावी-जंबगी …

Read More »

कै. श्री. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांचा स्मृतिदिन हा “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून आचरणात!

  बेळगाव : मराठा मंडळ चव्हाट गल्लीतील भातकांडे सभागृहामध्ये काल शुक्रवार दि. 22 जुलै रोजी मराठा मंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या सतराव्या स्मृतीदिनाचे आचरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू होत्या. संस्थेचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ व संस्थेचा प्रशासकीय वर्ग, संस्थेतील सर्व …

Read More »

म. ए. समितीच्यावतीने 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे …

Read More »

वडगाव सोनार गल्ली येथील दारू दुकानाचा वाढता उपद्रव!

  बेळगाव : वडगाव सोनार गल्ली कॉर्नर येथील दारू दुकान इतरत्र हलविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथील सचिन वाईन शॉप नामक दारू दुकानामुळे परिसरातील व्यावसायिकांना दारू पिण्यासाठी येणाऱ्यांकडून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुकानात दारू पिण्यासाठी येणाऱ्या मद्यपी दारू पिण्यासाठी येतात व रस्त्यावर थांबून चर्चा करतात. दारूच्या …

Read More »

ज्युनियर लिडर विंग सेंटर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

  बेळगाव : बेळगाव येथील ज्युनियर लिडर विंग सेंटरला जिओसी-इन-युनिट प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिमला येथे आयोजित कार्यक्रमात हे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडोचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल एस. एस. महाल यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडतर्फे ‘अ’ दर्जा प्राप्त …

Read More »

मोदी सरकारची देशात हुकूमशाही : एम. बी. पाटील

  बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आयटी, ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहेत. देशातील मोदी सरकार हुकूमशाही राबवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष एम बी पाटील यांनी केला. बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरकारवर जोरदार …

Read More »

जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश : ज्येष्ठ विचारवंत आर. वाय. पाटील

  जे. के. फाऊंडेशन, दमशि मंडळ बी. के. कॉलेज माजी विद्यार्थी संघटना, प्रगतिशील- एल्गार परिषदतर्फे मार्गदर्शन शिबिर, व्याख्यानाचे आयोजन बेळगांव : जीवनात जेवढा मोठा संघर्ष तितके मोठे यश संपादन करता येते किंवा आपण मिळवू शकतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. अनेक संकटांना मात करून पुढे जाण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्पर्धात्मक …

Read More »

महिला कुस्तीपटू स्मिता पाटील यांचे एनआयएस परीक्षेत यश

बेळगाव : बेळगावची एकलव्य पुरस्कार व राष्ट्रीय पदकविजेत्या महिला कुस्तीपटू स्मिता भावकाणा पाटील या पटियाळा येथे घेण्यात आलेल्या एनआयएस (NIS) डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण झाल्या असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते एनआयएस पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. कंग्राळी खुर्दच्या महिला मल्ल स्मिता पाटील यांनी शालेय जीवनापासून कुस्तीचा सराव करून अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन …

Read More »

बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा निषेध मोर्चा

बेळगाव : राजकीय हेतूने आणि द्वेषातून तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्‍या केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करत आज बेळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. आज बेळगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तपास यंत्रणांचा गैरवापर करणार्‍या भाजप सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी बेळगाव शहर, ग्रामीण आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या …

Read More »