Tuesday , April 1 2025
Breaking News

आजरा

तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार

  चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …

Read More »

कोल्हापूरचं ठरलं, हसन मुश्रीफ-संजय मंडलिकांमध्ये रंगणार लोकसभेची कुस्ती?

  कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी ज्या आमदारांच्या मदतीने प्रा. संजय मंडलिकांनी शिवसेनेच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभेचे मैदान सहजपणे मारले, त्याच मंडलिकांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र मुश्रीफांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या कुस्तीत खासदार धनंजय महाडिक हे प्रचाराचे भाजपचे प्रचार प्रमुख असणार हे विशेष. शिंदे …

Read More »

आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच

  आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात टस्करचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी हत्तीने गवसे गावात उभ्या असलेल्या शेड, एक टेम्पो आणि दोन दुचाकींचे नुकसान केले. मुसळधार पावसामुळे आजरा-आंबोली मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास खोळंबली. टस्कर बाजूला होईपर्यंत गोवा, आंबोली येथून येणारी वाहने अडकून पडली होती. दोन दिवसांपूर्वी टस्कराने शेतकरी महादेव …

Read More »

पूरग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्‍या पूरग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकर्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. या शेतकर्‍यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही …

Read More »

अलाबादेवी येथे दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अलाबादेवी (ता. चंदगड) या गावातील मेहनती शेतकरी सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यूमूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची …

Read More »

प्रा. नामदेवराव दंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी खरुजकर

चंदगड : येथील प्रा. नामदेवराव दंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी निंगोजी खरुजकर यांची व उपाध्यक्षपदी संजय दंडाप्पा पाटील यांची तर कोवाड शाखा अध्यक्षपदी ए. टी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक अनूराधा काटकर यांच्या अध्यक्षस्तेखाली संस्थेच्या कार्यालयात निवडीचा कार्यक्रम झाला. शैलेश सावंत, …

Read More »

आजरा पोलीसांची तत्परता, कोटीच्या गुन्ह्यातील हरीयाणाच्या दरोडेखोरांना केले अटक

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापरचे पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाब राज्यातील डेराबसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये जागा खरेदी विक्री व्यवसायाच्या ऑफिसवर दरोडा टाकुन व तेथील एका इसमावर गोळ्या घालून गंभीर जखमी करुन एक कोटी रुपये रक्कम लुटुन नेले. त्यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करत चौघांना पोलिसांनी …

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने चंदगडच्या पत्रकाराना रेनकोटांचे वाटप

चंदगड (एस. के. पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चंदगड पत्रकारांना तालुक्यातील मनसेचे कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रशांत अनगुडे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पुढाकाराने छत्र्यांचे व रेनकोटांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधाकर पाटील यांनी पत्रकार हा वेळी अवेळी वृतसंकलनासाठी …

Read More »

तेऊरवाडीतील शशिकांतला हवा एक मदतीचा हात

बैलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : बळीराजा.. अंगावरच्या घामावर शेतात सोनं पिकवून आपली तीन वेळची अन्नाची गरज भागवणरा तो अन त्याच्या खांद्याला खांदा देऊन राबणारे त्याचे सर्जा अन राजा बैल… पण कधी कधी नियती दगा देते अन त्याच्यावर न पेलावणारं अघटित संकट कोसळतं.. काल बेंदूर वर्षभर काबाडकष्ट …

Read More »

चंदगड पोलिसांकडून २४ तासात खूनाचा उलघडा!

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ते किणी (ता. चंदगड) या रस्त्यालगत अनिरुद्घ अँटो टू व्हीलर गॅरेज समोर फरशीवर प्रविण कृष्णा तरवाळ (वय ४० वर्ष) रा. किणी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर हा दि. १४ जून रोजी सकाळी सात वाजता बेशुद्धावस्थेत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. यानंतर चंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात …

Read More »