Monday , June 1 2026
Breaking News

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love

 

नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण

निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. काही नागरिकांनी व्हॅनला आग लागल्याचे ओरडून चालकाला सांगितले. त्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने वाहनातून पुढे घेतल्याने त्याचा जीव बचावला. सोमवारी (ता.२) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निपाणी- इचलकरंजी मार्गावरील अक्कोळ रस्त्यावरील साई शंकर नगरला जाणाऱ्या वळणा वरील मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्यामध्ये असलेला एकमेव चालक आश्चर्यकारक रित्या बचावला आहे. तरीही व्हॅन पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. रामदास लडबे (रा. हंड्यानवाडी) असे या व्हॅन चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, हंड्यानवाडी येथीलरामदास यांनी वर्षापूर्वी नवीन व्हॅन(क्रमांक एम.एच.१३ ए.सी ६८१३) खरेदी केली होती. कामानिमित्त परगावी गेले होते. ते पुन्हा आपल्या गावाकडे व्हॅन घेऊन एकटेच गावाकडे निघाले होते. दिवसभर उन्हात प्रवास केल्याने वाहनाचे मशीन गरम झाले होते. त्यामुळे दुपारी चार वाजण्याचा सुमारास अक्कोळ रोडवर येताच त्यांच्या वाहनाला खालून शॉर्टसर्किटने आग लागली. पण त्याचे कल्पना न आल्याने तसेच निघाले होते. रस्त्यावर नागरिकांनी त्यांना ओरडून वाहनाला आग लागल्याची माहिती दिली. त्यामुळे अखेर त्यांनी वाहन सावकाश घेऊन बंद करून त्यामधून उडी घेतली.
परिसरातील नागरिकांनी निपाणी येथील अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून त्या आगीची कल्पना देण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला. पण कार्यालयातील दूरध्वनी सुमारे अर्धा तास उचलला गेला नाही. त्यामुळे या वेळेत आगीने रौद्ररूप धारण केल्याने व्हॅन आगीच्या भक्षसस्थानी पडली. अखेर पाऊण तासानंतर अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत वाहनाची राख रांगोळी झाली होती. अग्निशामक दलाच्या दुर्लक्षामुळे उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
————————————————————-
उन्हाळ्याच्या प्रारंभी पहिलीच घटना
महिनाभरापासून यंदाच्या उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. गेल्या आठवड्यापासून त्याचे तीव्रता वाढली आहे. त्यामुळे निपाणी परिसरात भरणे कारची ही पहिलीच घटना घडली आहे. या पुढील काळात तरी अग्निशामक दलाने साखरकर राहून तात्काळ आगेच्या घटनांवर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव नाक्यावरील जलवाहिनीला दुरुस्तीनंतरही गळत

Spread the love  शहर विस्तारले पण पाणी प्रश्न सुटेना निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचा विस्तार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *