मुंबई : सीमावादाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र परिवहन विभागाने कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातून बेळगावला जाणार्या बसेस तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबादच्या दौंड गावात मराठी संघटनेने आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील परिवहन बसेसवर काळी शाई लावण्यात आली असून, खबरदारीचा …
Read More »कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती …
Read More »कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. आमचा भाग आम्हाला मिळणारच आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याबरोबरोबरच पक्षाचा …
Read More »“…तर काय देता येईल याबद्दल बोलता येईल”; सांगलीतील गावांवरुन चालू असलेल्या कर्नाटक- महाराष्ट्र वादावर पवारांचं सूचक विधान
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल जत तालुक्यातील ४० गावं आणि आज सोलापूर, अक्कलकोटमधील कानडी भाषिकांवरून केलेल्या विधानांमुळे महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान, सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना परखड शब्दात सुनावले आहे. जर ते बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर मराठी भाषिक प्रदेश …
Read More »“कुणीही यावं, टपली मारून जावं आणि आम्ही…”, उद्धव ठाकरेंचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्र
मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील काही भागावर दावा केल्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सांगलीतल्या जत तालुक्यातील ४० गावांवर कर्नाटक सरकारने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यावरही बोम्मई यांनी खोचक शब्दांत ट्वीट करत टीका केली. त्यानंतर …
Read More »कर्नाटक आणि पाकिस्तानमध्ये काय फरक, सीएम बोम्मईंवर नीलम गोऱ्हेंचा प्रहार
मुंबई : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ‘सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केले. यावर आता नव्याने राजकीय वाद सुरू झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोलापूर आणि …
Read More »ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन? अफवा की सत्य…
मुंबई : : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त काल (दि.२३) रात्री पासून येत आहे. मात्र त्यांच्या कुटूंबिंयाकडून निधनाचे वृताबाबत नकार देण्यात आला आहे. तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या संदर्भात आज सकाळी …
Read More »पत्नीचा गळा चिरुन केला खून; पती अटकेत
कोल्हापूर जिल्ह्यातील घटना शिरोली : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली. पोलिसांतून …
Read More »कर्नाटकाकडून दिशाभूल करण्याचे काम : जयंत पाटील
मुंबई : सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. जत तालुक्यातील 65 गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे …
Read More »महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडची गावं घेण्याचा आमचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
मुंबई : “महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधला आहे. आपण त्या गावांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta