मुंबई : काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही, असं वक्तव्यही शरद पवार यांनी केलं आहे. ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचं पुण्यामध्ये शरद …
Read More »कोल्हापूर : मानोली येथे बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : मानोली पैकी मुसलमानवाडी (ता. शाहूवाडी) येथे अवैद्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रसाद रवींद्र कांबळे (वय २८, रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हिरालाल निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार संशयित कांबळे याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ …
Read More »खा. धैर्यशील माने यांच्या घरावर 25 जुलै रोजी शिवसैनिकांचा मोर्चा
कोल्हापूर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर …
Read More »मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्ली दौर्यावर
मुंबई : : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्यावर आहेत. या दौर्यात ते अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो. राज्यात …
Read More »हुपरी नगरपालिकेत तृतीयपंथी ’देव तात्या’ बनले स्वीकृत नगरसेवक; राज्यातील पहिलीच निवड
हुपरी : हुपरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देवतात्या’ म्हणून प्रसिध्द असणार्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड झाली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची हा राज्यातील पहिलीची निवड आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात या निवडीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते, तर या ठिकाणी मोठी …
Read More »आमचीच शिवसेना खरी : दीपक केसरकर
मुंबई : तुम्ही कितीही यात्रा काढा, लोकांच्या मनात कितीही संभ्रम निर्माण करा. आमची शिवसेना खरी असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटलं की, आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांची बदनामी का सुरू आहे. ज्यांनी आमदारांची काळजी …
Read More »खासदार संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा : आमदार सतेज पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. 2019 मध्ये स्वतःची रसद पुरवून संजय मंडलिक यांना विजयी गुलाल लावलेल्या आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय मंडलिक यांच्या बंडखोरीनंतर सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य …
Read More »दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण ‘एटीएस’कडे द्यावेच लागेल
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी तपासाला होत असलेल्या विलंबावर उच्च न्यायालयाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण आता तपासासाठी दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवावेच लागेल, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. याबाबत एक ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले. न्यायमूर्ती …
Read More »कोल्हापूर महापालिका कनिष्ठ अभियंता दहा हजारांची लाच घेताना जाळ्यात
कोल्हापूर : नवीन पाणी कनेक्शन मंजूरीसाठी १० हजारांची लाच घेताना महापालिका शहर पाणी पुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. राजेंद्र बळवंत हुजरे (वय ४५, रा. आर. के. नगर) असे संशयिताचे नाव आहे. रंकाळा स्टॅन्ड परिसरात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे महापालिकेकडील मान्यताप्राप्त प्लंबर आहेत. त्यांनी दोन …
Read More »यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा दुसरा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बंध असल्याने राज्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta