Friday , November 22 2024
Breaking News

महाराष्ट्र

मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे मी आभार मानतो : राज ठाकरे

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्यभरात सुरू असलेल्या गदारोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे आभार मानले आहेत. ’महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी आज सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. या मशिदी चालवणार्‍या मौलवींचे …

Read More »

ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाबाबतचा जुना व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला होता. बाळासाहेबांच्या भाषणाचे कॅसेट्स पाठवू त्या पहा. सर्व भोंगे बंद करा असे …

Read More »

अखेर राणा दाम्पत्याला दिलासा, सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा …

Read More »

नागनवाडीच्या प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील ‘उंबळट ‘ व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘उंबळट’ हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे (नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे ‘उंबळट’ हे पहिले व्यक्तीचित्रण …

Read More »

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांचा मांडेदुर्गचे कोच राम पवार यांच्या घरी सत्कार

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : गेल्या बावीस वर्षाचा कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ संपवून मानाची गदा पटकावल्याचा विशेष आनंद झाल्याची भावना महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली. आपल्या घरी कुस्तीची परंपरा असून त्याचबरोबर सैन्य दलातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मांडेदुर्ग (ता. चंदगड)चे कुस्ती प्रशिक्षक राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेला प्रोत्साहन …

Read More »

चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांची ८८ जयंती रक्तदान शिबिराने साजरी

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त आज म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली.या रक्तदान शिबिरमध्ये पंचक्रोशितिल एकूण 70 तरुणांनी रक्तदान केले. तसेच स्व. नरसिंगराव पाटील यांचा म्हाळेवाडी येथील सहकार संकूलनामध्ये अर्धपुतळ्याचे आमदार …

Read More »

बेळगाव-निपाणी-कारवारचा महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार या मराठी भाषिक गावांचा समावेश महाराष्ट्रात व्हायलाच हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. आज महाराष्ट्र दिनी पुण्यात आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमानंतर बोलताना पवार म्हणाले, “सीमेवरील बेळगाव-निपाणी-कारवार ही मराठी भाषक गावं …

Read More »

कोल्हापूर कन्या कस्तुरीने सर केले अन्नपूर्णा शिखर

कोल्हापूर : जगात सर्वात खडतर समजले जाणारे अष्टहजारी अन्नपूर्णा 1 शिखर कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने सर केले. हे शिखर सर करणारी ती जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे. 24 मार्चपासून सुरू झालेल्या तिच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. साधारणपणे 15 मे दरम्यान चांगली वेदर विंडो पाहून …

Read More »

महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले, त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला. …

Read More »

राज्याच्या भूगर्भात मुंबई तोडण्याच्या हालचालींना वेग; राऊतांचा भाजपावर आरोप

मुंबई : महाराष्ट्राच्या स्थापनेला आज ६२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आपल्या रोखठोक या सदरातून महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्न दाखवतात, तेच महाराष्ट्राचे खरे शत्रू असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यासोबतच मुंबई कोणाची या प्रश्नाचा उहापोह करताना …

Read More »