Monday , September 21 2026
Breaking News

महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर आधी शिवसेनेचे तुकडे करा : संजय राऊत यांचा घणाघात

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीत दाखल झाले असून, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी शिंदेच्या या दौऱ्याला अधिक महत्त्वा प्राप्त झाले आहे. या सर्वामध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शिवसेने नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राज्याचे तीन तुकडे करण्यापूर्वी भाजपने शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी त्याचे तुकडे करण्याचा डाव आखल्याचा हल्लाबोल केला आहे. फक्त आमदार खासदारच सेनेची ताकद नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बंडामुळे शिवसेनेची ताकद कमी होणार नसल्याचेही ते म्हणाले.

खासदारांच्या घराला सुरक्षेसाठी यंत्रणांचा गैरवापर होत आहे. शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, त्यांचे दिल्ली दौरे होणारच असेही राऊत म्हणाले. सत्तास्थापनेनंतर उद्भवलेल्या संघर्षात आतापर्यंत शिवसेनेलाच धक्क्यांवर धक्के बसत आहेत मात्र, शिवसेना कोणत्याही संघर्षाला दोन हात करण्यासाठी समर्थ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच जे होईल ते पाहून घेऊ असे विधानही राऊतांनी केले आहे.

महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत हे भाजपचे नेतेच सांगत आहेत. मात्र, राज्याचे तीन तुकडे करण्यापूर्वी भाजप शिवसेनेचे तुकडे करू पाहत आहे. जर महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे असतील तर त्याआधी शिवसेनेचे तुकडे करा अखंड शिवसेना फोडा, सेनेची ताकद कमी करण्याचा डाव आखण्याचा प्रयत्न आहे. मात्र, शिवसेनेच्या चिन्हावर जे निवडून आले आहेत त्यांनी जरी आज पाठीत खंजीर खूपसण्याचा प्रयत्न केला आहे असे असले तरी शिवसेनेची ताकद काही केल्या कमी होणार नाही. कारण आमदार आणि खासदारच शिवसेनेची ताकद नसून, शिवसेना या सर्वातून पुन्हा उभी राहिल असा विश्वास राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच ज्यांच्या घराबाहेर आज चौकी पहारे लागले आहेत. त्यांना कोणत्याही सभागृहात येण आम्ही कठीण करू असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *