पंढरपूर : राज्यभर उत्साह आहे. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतल्या दिग्गजांच्या भेटीगाठी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी भाजपमधील अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतल्या. शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सुरु झालेला भेटीचा सिलसिला शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर संपला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »ठरलं! आषाढीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार, निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौर्यावर येत आहेत. मात्र, राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिलीये. मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहा …
Read More »शिवसेना खासदारांच्या बैठकीची केवळ अफवा; कृपाल तुमाने यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. याच अनुषंगाने रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शुक्रवारी रात्री काही खासदारांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती. परंतु, खासदारांच्या बैठकीची केवळ अफवा आहे. आपण गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्येच आहे, अशी स्पष्टोक्ती …
Read More »जोरदार पावसामुळे कोल्हापूरात पुन्हा महापुराची धास्ती
कोल्हापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप चालू झाली आहे. धरण क्षेत्रात देखील दमदार अतिवृष्टी बरसत आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे. कृष्णा नदीपात्रातील वाढते पाणी तर पंचगंगा नदीपात्रातून पाणी बाहेर पडल्याने वाढत असलेल्या पाण्याची धास्ती शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी घेतली आहे. गेल्या …
Read More »आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करु, पावसाळी अधिवेशनाच्याआधी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.9) पत्रकार परिषदेत सांगितले. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली दौर्याबाबत माहिती दिली. या दौर्यामागे …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान
कोल्हापूर : राज्यातील मुदत संपलेल्या ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे आदेश शुक्रवारी (दि. ८ जुलै) राज्य निवडणुका आयोगाने जाहीर केला. ज्या जिल्ह्यात पर्जन्यमान कमी आहे, त्या भागातील पालिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा देखिल समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगूड …
Read More »संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! अटक वॉरंट जारी
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या तक्रारीनंतर शिवसेना नेते संजय राऊत याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांनी, मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ज्यानंतर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात …
Read More »“धनुष्यबाण” शिवसेनेचा आहे अन् पुढेही राहील : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्य बाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे वृत्त समोर आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. ‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे …
Read More »वारकर्यांच्या आग्रहामुळे पंढरपूरला जाणार : उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात सत्तानाट्य रंगलेलं असताना पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा कोण करणार यावरुन चर्चा रंगली होती. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आले आणि महापूजा ते करणार यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, आपण पंढरपूरला जाणार आहोत, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. माध्यमांशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta