Wednesday , March 4 2026
Breaking News

महाराष्ट्र

हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नसल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर हेच सरकार आलं असतं याचा पुनरुच्चार केला. तसंच आता पाचही वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री …

Read More »

अलाबादेवी येथे दाव्याचा गळफास लागल्याने बैलांचा मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अलाबादेवी (ता. चंदगड) या गावातील मेहनती शेतकरी सुरेश कृष्णा घोळसे यांच्यावर ऐन शेतीकामाच्या हंगामात मोठं संकट कोसळल. सुरेश यांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोड दावे एकमेकांमध्ये अडकल्याने फास लागून मरण पावली. शेतकऱ्याचा आधार असणारे बैल मृत्यूमूखी पडलेला हा प्रसंग पाहताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होत. तर ज्यांची …

Read More »

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथबद्ध

मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील १० दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना आज (दि.३०) पूर्णविराम मिळाला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्‍यमंत्रीपदी शपथबद्‍ध झाले. माझा मंत्रीमंडळात सहभाग असणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी केली होती. मात्र …

Read More »

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

 देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई : 2019 च्या निवडणुकीत भाजप शिवसेना असे युतीची निवडणूक झाली होती. भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या.त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल असे स्पष्टपणे सांगितले होते.मात्र शिवसेना नेत्यांनी हिंदूत्वाला नेहमीच विरोध करणाऱ्यांशी संगणमत करून सत्ता स्थापन केले. भाजपने हाती घेतलेल्या अनेक …

Read More »

राज्याच्या विकासासाठी सत्तांतराचा सुर्योदय महत्वाचा : आनंद रेखी

शिवसेना पक्षप्रमुखांनी शुभाशिर्वादासह सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन मुंबई : महाराष्ट्रात तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या सत्तांतराचा सुर्योदय विकासाची नवीन उर्जा घेवून आलेला आहे, असे ठाम मत भाजप नेते आनंद रेखी यांनी गुरूवारी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमुळे राज्याचा रखडलेल्या विकासासाठी भाजप-शिवसेना सत्तेत येणे आवश्यक होतेच, अशी भावना देखील यानिमित्ताने त्यांनी …

Read More »

फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता होणार शपथविधी, सूत्रांची माहिती

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस …

Read More »

प्रा. नामदेवराव दंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी खरुजकर

चंदगड : येथील प्रा. नामदेवराव दंडगेकर चंदगड तालुका शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी निंगोजी खरुजकर यांची व उपाध्यक्षपदी संजय दंडाप्पा पाटील यांची तर कोवाड शाखा अध्यक्षपदी ए. टी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक अनूराधा काटकर यांच्या अध्यक्षस्तेखाली संस्थेच्या कार्यालयात निवडीचा कार्यक्रम झाला. शैलेश सावंत, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण? नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन संस्थगित

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशानुसार आता बहुमत चाचणीची गरज नाही. त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज …

Read More »

भाजपच्या गोटात हालचाली जोरात, आज सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता

मुंबई : 36 दिवसात बनलेले तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार. अडीच वर्ष चाललं आणि 9 दिवसात कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे पुढच्या एक ते दोन दिवसात फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. भाजपच्या …

Read More »