चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : मुख्याध्यापिकेच्या सेवनिवृत्तीनिमित्त ग्रंथतुला करून बालसाहित्य व शालेय पुस्तके भेट देत अनोख्या पद्धतीने निरोप समारंभ दाटे (ता.चंंदगड) केंद्रशाळेत पार पडला. मुख्याध्यापिका मंगल भोसले यांचा मुलगा अवधूत भोसले व कन्या दिपीका भोसले यांनी हे अभिनव पाऊल उचलत शालेय साहित्य संपदेस सहकार्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन …
Read More »गडहिंग्लज उपविभागाकडून सायबर गुन्हेबाबत जनजागृतीपर अभियान…
कोल्हापूर (ज्ञानेश्वर पाटील) : आजच्या युगात मोबाईल म्हणजे श्वास व ध्यास झाला आहे. परंतु मोबाईल व संगणक वापरताना पुरेशी माहिती नसल्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळेच आपण सायबर साक्षर होणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेट बँकींग, ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन गेम्स, मनोरंजन, शिक्षण, ऑनलाईन संवाद, सोशल माध्यम याकरिता करीता इंटरनेटशी संबध …
Read More »चंदगड तालुका शिक्षण परिषदेकडून काळ्या फिती लावून आंदोलन
माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नांना परिषदेने फोडली वाचा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मार्फत चंदगड तालूक्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून सर्व कामकाज केले.१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जूनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती, कोरोना कामगिरीवर असताना विमा सरंक्षण, विना अनुदान शाळांना अनुदान …
Read More »लाच स्विकारतांना उपलेखापालासह तलाठी जाळ्यात; आजर्यातील घटना
आजरा : वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच स्विकारतांना उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसीलदार संजय श्रीपती इळके (वय 52) रा. उतूर (ता. आजरा) व इटे (ता. आजरा) या सजाचा तलाठी राहूल पंडीतराव बंडगर (वय33) मूळ रा. महाडिक कॉलनी, प्लॉट न. 27. ई. वार्ड …
Read More »म्हाळेवाडी येथे नागरिकांचे लसीकरण मोहिम संपन्न
तेऊरवाडी (एस.के. पाटील) : म्हाळेवाडी ता. चंदगड येथे कोविड -१९ पासून गावाला मुक्त करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण मोहिम… आमदार राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली.सध्या सुरु असलेल्या शेतीच्या कामांची धावपळ व लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणारी लोकांची गर्दी पाहता म्हाळेवाडीचे सरपंच सी. ए. पाटील यांनी आपल्या गावातच नागरिकांना …
Read More »महाराष्ट्र विधानसभेत धक्काबुक्की; भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित
मुंबई : तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदाराचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईनंतर विरोधी पक्षानं पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक भिडले. …
Read More »बाबा धबधबा ठरला पर्यटकांच्या पसंतीला…
बेजबाबदार पर्यटकांकडून होतीये नासधूस चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारगडपासून अगदी ठराविक अंतरावर असणाऱ्या बाबा धबधब्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. या ठिकाणी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा होत असून दिवसेंदिवस बाबा धबधब्याला गर्दी होताना दिसत आहे. निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य व …
Read More »३१ जुलै २०२१ पर्यंत ‘एमपीएससी’च्या सर्व रिक्त जागा भरणार : अजित पवार
मुंबई : राज्य सरकार ३१ जुलै २०२१पर्यंत ‘एमपीएससी’च्या सर्व रिक्त जागा भरणारा आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) लेखी परीक्षा उत्तीर्ण होवूनही दोन वर्ष पदे न भरल्याने विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने काल आत्महत्या …
Read More »यंदाही जांबरे प्रकल्पावरील वीज निर्मितीची प्रतिक्षाच…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : जांबरे मध्यम प्रकल्पावर बीओटी तत्वावर वीज निर्मिती प्रकल्पाचे काम गेल्या वर्षभरापासून प्रगतीपथावर असून या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप पूर्ण झालेले नाही. हा वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण होईल,असे पत्र लघुपाटबंधारे बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी अडकूर येथील संदीप अर्दाळकर यांना गेल्या ऑक्टोबर महिन्यात पाठविले …
Read More »विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार : संजय राऊत
नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचे म्हटले आहे. या निवडणुका जर बिनविरोध झाल्यास राज्यावर मोठे उपकार होतील, असेही त्यांनी सूचक वक्तव्य …
Read More »