Friday , November 22 2024
Breaking News

महाराष्ट्र

कोरोना काळात 300 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी कोल्हापूरची प्रिया पाटील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वच्छतादूत

  कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांत युवकांना सहभागी करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या प्रिया पाटीलची सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रिया पाटील विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता 300 हून अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. तिच्या या सामाजिक …

Read More »

हर हर महादेव चित्रपटाचा वाद टोकाला : स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झी स्टुडीओवर हल्लाबोल

  हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट १८ डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टिव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनिशी करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

  मुंबई : महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. या महामोर्चासाठी जोरदारी तयारी करण्यात आली होती. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांसह आघाडीसोबत असलेले छोटे पक्ष, पुरोगामी संस्था, संघटना रस्त्यावर उतरले आहेत आणि हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीने …

Read More »

शिंदे सरकार सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी : उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई

  चंदगड : सीमाभागातील अडीअडचणी समजून घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी असल्याचे मत राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केले.‌ शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बाळासाहेबांची शिवसेना प्रणित शिवशाही युवा …

Read More »

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे सीमावाद पेटला : हेमंत पाटील 

अमित शहांची शिष्टाई कामाला येणार; मुख्यमंत्र्यांनी समोपचाराने घ्यावे मुंबई : केवळ राजकारणामुळे महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद तापवला जातोय. भाषेच्या मुद्दयावरून दोन्ही राज्यातील नारिकांच्या भावना भडकावत त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा मानस काही राजकीय पक्षांचा आहे. हे लक्षात येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावादात शिष्टाई करीत दोन्ही राज्यांना, या राज्यातील विरोधी पक्षांना …

Read More »

‘हे ट्वीट म्हणजे जखमेवर मीठ, आपले मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री…’, सीमावादाच्या बैठकीवर ठाकरेंचा घणाघात

  मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावार काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बसवराज बोम्मई यांच्या ट्वीटबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली, तेव्हा ते ट्वीटर अकाऊंट आपलं नसून …

Read More »

शंभूराज देसाई उद्या बेळगावच्या सीमेवरील शिनोळीत!

  चंदगड : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बुधवारी (14 डिसेंबर) दिल्लीत बैठक पार पडली. पण त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या शिनोळी गावात जाणार आहेत. मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचं शंभूराज …

Read More »

‘बनावट ट्विटर अकाऊंट’चा अमित शहांना संशय : अजित पवार

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळला असताना बुधवारी संध्याकाळी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना बनावट ट्विटर अकाऊंटवरून झालेल्या ट्वीट्समुळे तणाव वाढण्यास हातभार लागल्याचा संशय अमित शाह …

Read More »

सीमावादावर चर्चा करण्यासाठी सहा मंत्र्यांची समिती; अमित शाह यांचे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करु नये असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तसेच दोन्ही राज्यांतील प्रत्येकी तीन-तीन अशा एकूण सहा मंत्र्यांची एक समिती तयार करावी आणि सीमावादावर चर्चा करावी …

Read More »

सीमावादाचे सर्वाधिक चटके अमित शाहांच्या सासूरवाडीला बसत आहेत; संजय राऊत

  मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात दोन्ही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मधस्थी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत असून अमित शहांच्या उपस्थितीत बैठक …

Read More »