Wednesday , December 10 2025
Breaking News

महाराष्ट्र

शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस

  अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची …

Read More »

नऊ आमदार वगळता सर्व आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा? : जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

मुंबई : अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे. अपात्रतेची याचिका दाखल …

Read More »

नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

  मुंबई : शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या …

Read More »

पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

  नवी दिल्ली : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि …

Read More »

आंबोली धबधब्याला भेट देण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

  सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकांकडून पुन्हा एकदा तिकीट आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात 14 वर्षावरील व्यक्तीला 20 रुपये तर 5 वर्षावरील मुलास 10 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क आकारण्याचा अधिकार वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक एस. …

Read More »

शिंदे गटाप्रमाणे भाजपमध्ये देखील मंत्रीपदावरून नाराजी

  मुंबई : अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटात मंत्रीपदावरून दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची देखील माहिती समोर येत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना भाजपमध्ये देखील सर्व काही आलबेल नसल्याचा दावा …

Read More »

गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर

  मुंबई : सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कुठे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पहिली मी निवडणुक लढलो त्याचे चिन्ह होते बैल-जोडी, त्यानंतर गाय-वासरू …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी …

Read More »

कोणते पवार ‘पॉवरफुल’? आज होणार बहुमताचं चित्र स्पष्ट!

  मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गटाच्या मुंबईमध्ये बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला कोण उपस्थित राहाणार हे पहाणं महत्त्वाचं ठारणार आहे. आज दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गाटचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहाता यावं यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. 53 आमदारांपैकी किती आमदार …

Read More »

मुंबई -आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; 12 जणांचा चिरडून मृत्यू

  मुंबई : धुळे – मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त …

Read More »