Tuesday , March 3 2026
Breaking News

महाराष्ट्र

“भाजपाकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची तयारी”, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे विधान

  मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी …

Read More »

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर; गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता बंद, कोल्हापूर-गगनबावडा मार्गही बंद

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 आणि …

Read More »

कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पाणीप्रश्नी गावकरी आक्रमक, काठावरील गावांचा कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा

  कोल्हापूर : कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध आहेत. इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुळकूड, कसबा सांगाव, …

Read More »

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

  सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता. आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. …

Read More »

कोल्हापूरला धुवाँधार पावसाने झोडपले; 53 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी तर इतरत्र धुवाँधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सकाळी 7 ला पंचगंगेची पातळी 21.9 तर रात्री आठला 27.7 फुटापर्यंत होती. रात्री पावणे अकरा वाजता पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. बारा तासात सुमारे सहा फुटाने पातळी …

Read More »

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधारा पाण्याखाली

गडहिंग्लज : गेल्या तीन-चार दिवसांपासून पश्चिम घाटासह आजरा, गडहिंग्लज तालुक्यांत जोरदार पाऊस सुरु असून हिरण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडू लागले आहे. आज (दि. २०) सकाळी गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील निलजी बंधारा पाण्याखाली गेला असून, या बंधार्‍यावरुन होणारी वाहतूक बंद झाली आहे. काल (दि. १९) सायंकाळी पश्चिमेकडील ऐनापूर बंधार्‍यावर पाणी …

Read More »

प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली; 8 जण मृत्युमुखी

  रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली आणि पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं. या गावात 45 ते 50 घरांची वस्ती आहे, यातील 30 ते 40 घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली …

Read More »

कोल्हापुरात दमदार पाऊस; पश्चिम महाराष्ट्राला रेड अलर्ट

  कोल्हापूर : रिपरिप पडणाऱ्या पावसाने मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात जोर पकडला. आज दिवसभर पावसाने हजेरी लावली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात पंधरवड्यापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. पाऊस जेमतेम आठवडाभर टिकला. शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जोरदार पावसाची प्रतीक्षा केली जात असताना गेले …

Read More »

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी?

  मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचा विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं …

Read More »

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

  पुणे : मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी …

Read More »