Wednesday , March 4 2026
Breaking News

महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात; राज्य सरकारचा निर्णय

  मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारकडून कपात करण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत साधारणपणे ६० ते ७० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. मात्र, आता या सर्वांनाच आधीच्या जागेवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात कोणीही अधिकृत माहिती दिलेली …

Read More »

विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज पाटण्यात जाणार

  शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार मुंबई : मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची फौज पाटण्यात दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेतेही पाटण्यातल्या बैठकीत असणार आहेत. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य …

Read More »

उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे १६ ठिकाणी छापे

  मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणी ईडीने ही कारवाई केली आहे. मुंबईत १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सुरेश चव्हाण यांच्या ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. बीएमसी कोविड घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने …

Read More »

बंड फसले असते तर शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती; दीपक केसरकरांचे खळबळजनक विधान

  मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बंडाळीच्या वर्षपुर्तीला मंत्री दिपक केसरकर यांनी धक्कादायक विधान केले आहे. जर बंडाचा हा डाव अयशस्वी झाला असता तर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना परत पाठविले असते आणि स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असे वक्तव्य केसरकर यांनी केले आहे. ठाकरे गटाच्या गद्दार …

Read More »

आमचं भांडण मोदी-शहांशी नव्हे, तर महाराष्ट्रद्रोह्यांशी : संजय राऊत

  मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आमचं वैयक्तिक भांडण नाही. तर आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्यांशी आहे. महाराष्ट्राला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आहे, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राऊत …

Read More »

कोल्हापूर येथे जुगार अड्ड्यावरील छाप्यावेळी तिसर्‍या मजल्यावरून उडी; एकाचा मृत्यू

  कोल्हापूर  : राजेंद्रनगर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडताच कारवाईच्या भीतीपोटी तरुणांनी तिसर्‍या मजल्यावरून उडी टाकली. यामध्ये साहिल मायकल मिणेकर-रजपूत (वय 26) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींना सुरुवातीला सीपीआर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यावेळी परिसरातील …

Read More »

ठाकरे गटाला मोठा धक्का, नॉट रिचेबल मनीषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार

  मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला …

Read More »

गडहिंग्लजला गांजाची शेती; पोलिसांकडून ७ लाखांचा गांजा जप्त

  गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ गावामध्ये गांजाची शेती केली असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. या माहितीवरून (शुक्रवार) सायंकाळी उशिरा पथकाने या ठिकाणी धाड टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून गांजाची शेती उध्वस्त केली. हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) येथे विष्णू सर्ज्याप्पा पिरापगोळ उर्फ कांबळे, काशाप्पा विष्णू पिरापगोळ उर्फ …

Read More »

अजित पवारांनी युतीत यावे : दीपक केसरकर

  शिर्डी (अहमदनगर) : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यक्षम नेते आहेत. नागरिक त्यांचा गांभीर्याने विचार करतात. त्यामुळे त्यांनी युतीमध्ये यावे, अशी खुली ऑफर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना दिली. मंत्री केसरकर आज (शुक्रवारी) श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते. या वेळी …

Read More »

प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; अशोक चव्हाणांचे नाव अध्यक्षपदासाठी

  मुंबई  : मुंबई काँग्रेस पाठोपाठ प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे वाहू लागले असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्याची काँग्रेसमधील काही आमदार दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर पटोले यांनाच कायम ठेवण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील एक गटही दिल्लीत प्रयत्नशील आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून …

Read More »