कोल्हापूर (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने …
Read More »‘आले रे आले ५० खोके आले…गद्दार हाय हाय’, मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली …
Read More »७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘एसटी’ मोफत; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. राज्यात ६५ हून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवासभाड्यात ५० टक्के तर शिवशाही बसेसमध्ये ४५ टक्के सवलत दिली जाते. आता …
Read More »बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय पाटील यांना “भारत कर्तव्यम्” समाजभूषण पुरस्कार
पद्मश्रीकार डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बेळगाव : शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात यंदाचा “भारत कर्तव्यम्” समाज भूषण पुरस्कार चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय केदारी पाटील यांना प्रदान करण्यात आला. …
Read More »कोल्हापूरात धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा!
कोल्हापूर : राज्यासह कोल्हापूरमध्ये काल स्वातंत्र्यदिन अपूर्व उत्साहात साजरा होत असताना त्याला गालबोट लावण्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. शहरातील शुक्रवार पेठेतील एका तालीम मंडळाच्या कार्यक्रमात भर दिवसा डॉल्बीच्या ठेक्यावर तृतीयपंथी नाचवत असलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याने संतापाची लाट …
Read More »भाजपकडून विधान परिषदेच्या सभापतिपदासाठी तयारी, राम शिंदेंचं नाव आघाडीवर!
मुंबई : शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक मलाईदार खाते भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. आता भाजपने विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही नव्याने सादर केली जाणार आहे. उद्या …
Read More »महाराष्ट्रात उद्यापासून पावसाळी अधिवेशन
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. …
Read More »आपल्या ज्ञानेंद्रियांची कवाडे सदैव उघडी ठेवा; अध्ययन करा व अद्यावत रहा! : प. पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी
डॉ. घाळी जन्मशताब्दीपूर्ती सांगता समारंभ निमित्य तेऊरवाडी (एस. के. पाटील) : “प्रत्येक दगडात मूर्ती असतेच. मूर्तीवरील अनावश्यक थर बाजूला करण्याचे काम शिक्षण करते. शिक्षणाने प्रतिभा बाहेर येते. भारतीय शिक्षण संवेदनशील आहे सहानुभूती व सौहार्दाचे दर्शन घडवणारी आपली भारतीय संस्कृती महान आहे. विश्व एक विद्यापीठ आहे. शिकण्यासाठी सदैव सज्ज रहा. …
Read More »कोदाळीच्या सुभेदार मेजर रमेश गावडे यांना राष्ट्रपतींकडून ऑनररी लेफ्टनंट रैंक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सुभेदार मेजर रमेश धानू गावडे सेवा निवृत्त ( Indian Army) गाव कोदाळी (चंदगड) याना आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती Suprem Commander of Armed Forces याच्याकडून या 15 ऑगस्ट 2022 रोजी ऑनररी लेफ्टनंट रैंक जाहीर केली आहे. हा ऑनर चंदगडमधील कोदाळी सारख्या दुर्गम भागातील एका सैन्यदलाच्या …
Read More »कोल्हापूर पोलिसांच्या सायकल रॅलीने केला गडहिंग्लज उपविभागाचा दौरा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर पोलिस दलातील १२ अधिकारी व ठाणे अंमलदार यांनी आज दि. १४ ऑगस्ट रोजी गडहिंग्लज उपविभागात सायकल रॅली काढून स्वातंत्र्याचा जयघोष केला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे या पोलिस दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत नेसरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील यांनी केले, सरपंच आशिष …
Read More »