मुंबई (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रशांत शिवाजी अनगुडे यांची मराठी कामगार सेनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. मराठी कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी ही मराठी कामगार सेना ही नेहमी सक्रिय असते. सदर निवड कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
