चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : शिनोळी खुर्द, चंदगड येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळचे सचिव व गावातील जाणकार व्यक्ती ह.भ.प. यल्लुप्पा भरमु पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या रक्षा विसर्जनानिमित्त जुन्या विधिना फाटा देत पर्यावरण पूरक रक्षा व मातीचा वापर करून शेतामध्ये नारळाची झाडे लावून आगळा-वेगळा उपक्रम पाटील कुटुंबीयाकडून राबविण्यात आला.
या विधायक कार्यक्रमप्रसंगी त्यांचे चिरंजीव परशराम पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, बाळासाहेब पाटील, भरमा पाटील, एम. एन. पाटील, व्हा. चेअरमन निंगापा पाटील, चव्हाटा दुध संस्थेचे मा.चेअरमन इरापा क. पाटील, प्रशांत पाटील सर, हलगेकर सर, वैजनाथ पाटील, लक्ष्मण कांबळे, सागर पाटील, गुंडुराव पाटील, विकास पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.