कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे. कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल हा देखील होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याची सुपीक जमीन यामध्ये जाणार आहे. येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असून हा प्रकल्प टोलनाक्यापासून जवळच असणाऱ्या गायरानात करावा या मागणीचे निवेदन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिले.
यावेळी चिकोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले उपस्थित होते.
यावेळी चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार यांनी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, युवराज माने, बाळासाहेब हादिकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील, मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनिर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वडर, संतोष चौगुले, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सेक्रेटरी कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे, यांच्यासह शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
निपाणीत पारंपरिक पद्धतीने विजयादशमी
Spread the love आमराई रेणुका मंदिरांत गर्दी; शमी पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रम निपाणी (वार्ता) : …