Friday , September 20 2024
Breaking News

पुरातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघांचे मृतदेह सापडले, नागरदळे व तळगुळी गावावर शोककळा

Spread the love

तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : दि. २३ रोजी ढोलगरवाडी व घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून एक युवक व एक महिला वाहून गेली होती. या दोघांचाही दोन दिवस शोध लागू न शकल्याने चिंता वाढली होती. पण आज तिसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह सापडल्याने शोध मोहीम संपली. या शोध मोहिमेत ग्रामस्थासह चंदगच्या आपदा टिमने
सहभाग घेतला होता. गुरूवारी दि. २३ रोजी सायंकाळच्या सुमारास नागरदळे येथील एअर इंडियामध्ये कामाला असलेला युवक अभिषेक संभाजी पाटील ढोलगरवाडी येथे ओढ्याला आलेल्या पाण्यातून वाहून गेला होता. गेले दोन दिवस शोध मोहिम राबवूनही तो सापडू शकला नव्हता. आज घटनास्थळापासून जवळपास काही अंतरावर असणाऱ्या लक्ष्मी शेताजवळचा ओढ्याच्या पात्रात झाडाच्या मूळामध्ये अभिषेकचा मृतदेह सापडला. नागरदळे येथील युवकांनी गेल्या दोन दिवसांपासून त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, आज पावसाने उसंत घेऊन पाणी पातळी कमी झाल्यावर या शोधमोहिमेला यश आले. या शोधमोहिमेत सरपंच दिलीप पाटील, उत्तम पाटील, जयसिंग पाटील, एकनाथ पाटील, अनिल मणगुतकर, विठ्ठल पाटील, कडलगे (खु) गावचे पोलीस पाटील राजेंद्र पाटील, पुंडलिक मारुती पाटील यांनी सहभाग घेतला. याबाबत माहिती मिळताच चंदगड पोलीस ठाण्याचे पो. ना. जमिर मकानदार, अमोल पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मृतदेहाची वैद्यकिय तपासणीसाठी चंदगडला पाठवण्यात आला.
तर घुल्लेवाडी येथे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून सुनिता पांडूरंग कंग्राळकर ही तळगुळीची महिला वाहून गेली होती. तीचाही दोन दिवस शोध लागला नव्हता. यामुळे कुटूंबियासह प्रशासन चिंताग्रस्थ बनले आहे. त्यातच ताम्रपर्णीला महापूर आल्याने शोधमोहिमेत अडथळे निर्माण झाले होते. पण घुल्लेवाडी त्याच ओढ्यात झाडात अडकलेला सुनिताचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सुद्धा कोवाड पोलीसानी पंचनामा करून वैद्यकिय तपासणीकरिता चंदगडला पाठविण्यात आला आहे. या दोन्ही घटनेचा तपास पो. हे. काँ. कुशाल शिंदे व अमर सायेकर करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

देवरवाडी गावातील भोंगळ कारभार लपवण्याच्या उद्देशाने गावसभा टाळणारी महिला सरपंच अपात्र

Spread the love  गेल्या वर्षभरापासून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधातील विद्यमान ग्राम पंचायत सदस्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *