Saturday , September 5 2026
Breaking News

‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’

Spread the love

कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. पाणी संथ गतीने कमी होत आहे. पाणी आडवे मागे सरकले असले तरी महामार्गावरील पाण्याची उंची कायम आहे.

अफवावर विश्वास ठेवू नका
पाण्याला प्रचंड वेग आहे. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी बोटीतून रस्त्याची पाहणी केली. पाण्याला वेग प्रचंड असून, पाण्याची पातळी आणखी तीन फूटाने कमी झाल्या नंतर, पोकलँडने रस्त्याची चाचपणी केली जाईल, त्यानंतर अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्यता भोसले यांनी व्यक्त केली. म्हणजेच पावसाने उघडीप दिली आणि पाण्याची पातळी कमी झाली तरच सायंकाळ नंतर महामार्गावरून अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

भक्तिमय वातावरणात श्रावण शुक्रवारची सांगता

Spread the love    गोकुळाष्टमीच्या उत्साहात वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन; घरोघरी देवीपूजनासह सुवासिनींनी भरल्या एकमेकींच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *