खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवर अर्धवट केलेल्या रस्ता दुरूस्तीमुळे तसेच नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डा पडून पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना, चारचाकी वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धोका निर्माण होत आहे.
याची लोकप्रतिनिधीनी पाहणी करून संबंधित पीडब्लूडी खात्याच्या अधिकाऱ्यांना खड्डा बुजविण्याची सुचना करावी. अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. अजुन पावसाळा बरेच दिवस आहे. तेव्हा खड्डा बुजवावा नाही तर कुणाला तरी जीव गमवावा लागेल अशी प्रतिक्रिया नागरिकातून होत आहे.
*प्रतिक्रिया
जत- जांबोटी महामार्गावरी शहराच्या जांबोटी क्राॅसवर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी ते खड्डा बुजवावा.
– विनायक मुतगेकर
