चंदगडवासीयांकडून रास्ता रोको आंदोलन…
चंदगड (वार्ता) : सीमाभागवासीयांबद्दल महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चाललेला वाद हा नवा नाही. पुन्हा एकदा कर्नाटक सरकारच्या जाचक अटीमुळे चंदगड सीमाभागवासीयांवर अन्याय होताना पहायला मिळत आहे. कोल्हापुरातील चंदगड शिनोळी येथे चंदगडवासीयांकडून आर.टी.पी.सी.आर रद्द करावे या मागणीसाठी वेंगुर्ला रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
चंदगड तालुक्यापासून अगदी ठराविक अंतरावर असणाऱ्या बाची येथे बेळगाव रस्त्यावर कर्नाटक सरकारकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या भागांतील सीमाभागवासीय तसेच शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक या ठिकाणाहून दळण-वळण करत असतात. पण सध्या सणा-सुदिला आर.टी.पी.सी.आर सक्तीचे केल्याने या भागांतील लोकांना नाहक त्रास व गळचेपी होत आहे. अत्यावश्यक सेवा, आजारपणासाठी डॉक्टरकडे जाणे, शेतकऱ्यांना कच्चा माल आणणे-विक्री करणे अश्या विविध कारणासाठी लोक दळण-वळण करत असतात. पण आर.टी.पी.सी.आर नसल्याने त्यांना बेळगावमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळे याविषयी तीव्र निषेध करण्यात आला.
संकटकाळात कर्नाटक शासनाचा हा त्रास, खर तर आर.टी.पी.सी.आरची सक्ती का? ही जाचक अट शिथील करावी, बाची येथे कर्नाटक शासनाने लावलेल्या बॅरिकेट बाजुला करावे या मागणीकरिता हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव तहसीलदार यांना निवेदन देऊन चंदगडवासीयांनी व्यथा मांडली.
आंदोलनस्थळी शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील, उपसरपंच बंडु गुडेकर, प्रताप सुर्यवंशी,केतन खांडेकर, भैरू खांडेकर, डाॅ.एन.टी मुरकुटे, अमृत जत्ती, नारायण पाटील, राजु खांडेकर, अर्जुन पाटील, विनोद पाटील, प्रवीण पाटील, नामदेव सुतार, विशाल सावी, युवराज पाटील, राजू मेणसे, राजू किटवाडकर, अजित खांडेकर, प्रितम पाटील, शिवराज जत्ती यासह आदी युवावर्ग उपस्थित होता.