बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला आघाडीतर्फे नागपंचमीसाठी लागणारा फराळ माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना फराळ बनविणे आर्थिकदृष्ट्या जड जात आहे. याकडे लक्ष देऊन महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या वर्षीपासून नागपंचमीचा फराळ माफक दरात देण्याच्या उपक्रम सुरु आहे. या फळात 5 पोहे लाडू, 5 रवा लाडू, 5 बेसन लाडू, 5 तबीट, १/४ कीलो चिवडा, लाह्या हे सर्व मिळून एक सेट 160 रुपयांना विक्री केले जात आहे.
या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर व त्यांच्या सहकारी राजश्री बाबूळकर, शामीनी पाटील, आशा पाटील, श्रध्दा मंडोळकर, भाग्यश्री जाधव, माला जाधव, साशी किल्लेकर, राजश्री बडमंजी, प्रभा कूरणे, शाकिरा गोकाक व इतर महिला उपस्थित होत्या.
Check Also
बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Spread the love पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण …