बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व साहेब फौंडेशनच्यावतीने हलशीवाडी येथे गुरुवारी चिकनगुनिया डेंगू लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाचशेहून अधिक लोकांना वितरण करण्यात आले
प्रारंभी अनंत देसाई यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाचा नागरिकांना चांगला लाभ होणार असून यापुढेही युवा समितीने असेच कार्य करावे असे मत व्यक्त केले. त्यानंतर शुभम देसाई, विशाल देसाई, वैभव देसाई यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले. मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रामचंद्र देसाई, निंगाप्पा देसाई, रमेश देसाई, राजू देसाई, सुभाष देसाई, मल्लाप्पा सुतार, रघुनाथ देसाई, अर्जुन देसाई, गुणाजी देसाई, साईश सुतार आदी उपस्थित होते. निलेश देसाई यांनी आभार मानले.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …