चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला होता.
आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार ठिकठिकाणी भारत बंदला प्रतिसाद देत चंदगड येथे रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेस चंदगड तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात आज भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शेतकरी संयुक्त किसान मोर्चा, सेंटर ऑफ इंडियन रेड युनियन, चंदगड तालुका साखर कामगार युनियन कोल्हापूर जिल्हा मोर्चा यांनीही सहभाग घेतला.
याप्रसंगी गोपाळराव पाटील, विक्रम चव्हाण पाटील, महादेवराव मंडलिक पाटील, बाळासाहेब हळदणकर, कलीम मदार, अभिजित गुरुबे, राजेंद्र परीट, उदय देसाई, जयसिंग पाटील, प्रसाद वाडकर, नितीन फाटकसह आदीं मंडळीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
