चंदगड : न्हावेली ता. चंदगड येथे गोवा बनावटीच्या बेकायदा दारु साठ्यावर चंदगड पोलिसांनी छापा टाकून एकूण 1 लाख 30 हजार 592 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी न्हावेली येथील आरोपी संतोष महादेव गावडे (पाटील) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने संतोष याने घराच्या मागील बाजूस असलेल्या जनावारांच्या गोठ्यात दारूसाठा करून ठेवला होता. पोलीसांच्या छाप्यावेळी आरोपी पळून गेला. गोवा येथील हा दारुसाठी आणण्यासाठी वापरण्यात आलेली आरोपीची झायलो गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्याचे पो. कॉ. युवराज संभाजी पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून ही कारवाई गुरुवारी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:च्या फायद्याकरीता बेकायदा बिगर परवाना बेकायदा गोवा बनावटीचा वेगवेगळ्या कंपनीच्या 1 लाख 30 हजार 512 रुपये किंमतीचा दारुसाठी महाराष्ट्र राज्याचा कर चुकवुन आपल्या झायलो गाडीतून गोवा येथून आणला होता.
तो आपल्या घरच्या मागील बाजूला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात साठा करुन ठेवला होता. याबाबतची माहिती मिळताच चंदगड पालिसांनी छापा टाकून हा सर्व मद्य साठा जप्त केला आहे.
पण आरोपी मात्र पळून गेला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. फौजदार एच. एस. नाईक करत आहेत.
Check Also
बांधकाम कामगारावरील अन्यायाविरोधात पाटणे फाटा येथे आमरण उपोषण
Spread the love चंदगड : शासनाकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र या …