Friday , November 6 2026
Breaking News

कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचार्‍यांचे आंदोलन तात्पूरते स्थगित

Spread the love

कोल्हापूर : गेल्या 19 दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी विलगीकरणासाठी एल्गार पुकारला आहे. मात्र, राज्य सरकारने तो मुद्दा बाजूला ठेवत 41 टक्के वेतनवाढ देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर विलीनीकरणाचा निर्णय समितीचा अहवालानंतर घेतला जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वेतनवाढ झाल्यानंतर विलीनीकरणाच्या मुद्यावर एसटी कर्मचारी आग्रही आहेत. त्यामुळे आझाद मैदानात अजूनही आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे काही कर्मचार्‍यांनी वेतनवाढीच्या घोषणेनंतर कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातूनही आज मोठी घोषणा करण्यात आली आहे.
एसटी कर्मचारी आंदोलन शुक्रवारी सायंकाळपासून तात्पूरते स्थगित करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी लढा सुरूच राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. याशिवाय आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाया शासनाने मागे घ्याव्यात अशीही मागणी त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगांव मराठी मित्र मंडळ पतसंस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Spread the love  सहकार आणि विश्वासाच्या बळावर प्रगतीची यशस्वी वाटचाल कोल्हापूर : बेळगांव मराठी मित्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *