चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूरातील चंदगड तालुक्यांमधील निट्टूर गावचे सुपुत्र श्रीकांत निंगोजी राजाराम पाटील यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पायधूनी पोलिस स्टेशन, झवेरी बाजार, मुंबई येथे निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यांमधून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
निट्टूर ग्रामस्थ मंडळ, मुंबई यांनी या स्टेशनला भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्काराद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी एन. आर. पाटील, नारायण पाटील, विठ्ठल पाटील, मारूती पाटील, युवराज पाटील, नरसिंह पाटील, राजाराम पाटील, गोपाळ लोंढेसह आदी मंडळी उपस्थित होते.
Check Also
तिलारी- दोडामार्ग घाटात गोमांस वाहतूक करणारा ट्रक पकडला, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Spread the love चंदगड : तिलारी- दोडामार्ग घाटात कोदाळी गावच्या हद्दीत तब्बल १५ लाख रुपये …