तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : रयत संघटनेला यश
निपाणी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने यंदाही विकेंड लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापार्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे संघटनेचा विकेंड लॉकडाऊनला विरोध नसून आधी शेतकरी, व्यापार्यांना 50 टक्के नुकसानभरपाई द्या, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केली केली होती याशिवाय जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकार्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार विकेंड कर्फ्यू शासनाने मागे घेतला आहे. याशिवाय त्या काळातील व्यापारी व शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई घेण्यासाठी वरिष्ठांकडे प्रयत्न करावा त्याची माहिती तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी दिली. शुक्रवारी दुपारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू पोवार व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
राजू पोवार म्हणाले, सलग दोन वर्षापासून लॉकडाऊन होत असल्याने सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापार्यांचे नुकसान होत आहे. अलीकडच्या काळात प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. पण गत महिन्यापासून पुन्हा विकेंड लॉकडाऊन होत असल्याने भाजीपाला विकणे व इतर कारणांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय बाजारपेठेत खरेदी केलेले भाजीपाला व्यापारी सलग दोन दिवस उचलत नसल्याने नुकसान सोसावे लागले. नाईट कर्फ्यू आणि विकेंड लॉकडाऊन लागू केल्याने सर्वसामान्य शेतकरी आणि व्यापार्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात वारंवार विकेंड कर्फ्यू केल्यास यासाठी रयत संघटनेचा विरोध नाही पण संबंधित व्यापारी व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अन्यथा संघटना रस्त्यावर उतरण्यासाठी तयार असल्याचेही राजू पोवार यांनी सांगितले होते. त्यानुसार तहसीलदाराशी बैठक होऊन विकेंड मागे घेण्यात आला.
यावेळी संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग, शहर अध्यक्ष उमेश भारमल, सेक्रेटरी भगवंत गायकवाड, बाळासाहेब हादिकर, बाळकृष्ण पाटील, तानाजी पाटील, कुमार पाटील, मधुकर सांडूगडे, शिवाजी वाडेकर, बाबासाहेब नामदेव साळुंखे, कलगोंडा कोटगे, बबन जामदार, सुभाष नाईक, शरद भोसले, चीनु कुळवमोडे, हरी जाधव, पांडुरंग तोडकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान
Spread the love मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …