Tuesday , June 25 2024
Breaking News

निट्टूरच्या कुस्ती आखाड्यात कर्नाटक केसरी किरण दावणगिरी याने मारले मैदान!

Spread the love

चंदगड (प्रतिनिधी) : गुढीपाडव्यानिमित्त आयोजित 100 वर्षाची परंपरा असलेल्या निट्टूरच्या कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी किरण दावणगिरी याने सांगलीच्या भोसले व्यायामशाळेच्या सुबोद पाटील याला अस्मान दाखवत मनाची गदा पटकावली. माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील व विष्णु जोशिलकर यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.

यावेळी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीचा मल्ल अरुण बोंगाळे व रत्नकुमार मठपती आखाड्याचा मल्ल संगमेश बिराजदार यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी झालेली कुस्ती बरोबरीत सुटली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत मठपती आखाड्याचा मल्ल शिवय्या पोटू पाटील याने बानगेच्या शशिकांत भोंगार्डेला आस्मान दाखविले.

यंदा पहिल्यांदाच मैदानात दंगल गर्ल्स…
निट्टूरच्या कुस्ती मैदानाला शंभर वर्षाची जुनी परंपरा असून दरवर्षी गुढीपाडव्याला ग्रामस्थ व तालीम मंडळातर्फे कुस्तीचे मैदान भरविले जाते. यावर्षीच्या आखाड्यात हणमंत घुल्लेच्या हालगीच्या तालावर ८० निकाली कुस्त्या झाल्या. त्यात यंदा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या महिला कुस्तीत स्वाती कडोली व पूजा राशिवडे यांच्यात झालेली प्रथम क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली; तर मृणाल राशिवडे व सानिका कडोली यांच्यात झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सानिकाने मृणालवर साखळी डावावर विजय मिळविला.

कोल्हापूर, बेळगाव, निपाणी, बाणगे कंग्राळी, मुतगा, कडोली यासह चंदगड, आजरा व गडहिंग्लज येथून मल्लांनी हजेरी लावली होती.

About Belgaum Varta

Check Also

शेट्टीहळ्ळीत हत्तींचा उपद्रव : उभ्या पिकाची नासाडी

Spread the love  चंदगड : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर जंगली हत्ती धुमाकूळ घालत असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *