Sunday , July 26 2026
Breaking News

धामणे येथे बैलगाडा पळविण्याची शर्यत उत्साहात

Spread the love

बेळगाव : धामणे (ता. जि. बेळगाव) येथील श्री कलमेश्वर शेतकरी संघटना व तरुण युवक मंडळ यांच्यातर्फे खास बसवेश्वर यात्रेनिमित्त आयोजित रिकामा गाडा बैलगाडीने पळविण्याची जंगी शर्यत नुकतीच उत्साहात पार पडली.

धामणे येथे आयोजित सदर रिकामा गाडा बैलगाडीने पळविण्याच्या शर्यतीचा उद्घाटन समारंभ काल रविवारी गावातील प्रतिष्ठित नागरिक कुमाण्णा कोमाण्णाचे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल्यानंतर गोरल यांच्या हस्ते बैलगाडा चालवून शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री कलमेश्वर शेतकरी संघटना व तरुण युवक मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बहुसंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते. सदर शर्यतीत धामणे पंचक्रोशीतील बऱ्याच बैल जोडी मालकांनी या शर्यतीत सहभाग दर्शविला होता.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *