तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील रखडलेले ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी एम.आय.डी.सी मधील जागेची आमदार राजेश पाटील यांच्या सोबत एम.आय.डी.सी रिजनल अधिकरी धनंजय इंगळे यांनी पाहणी केली.
यावेळी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, एम.आय.डी.सी मधील ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर प्रत्यक्ष बांधकाम कामाला ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये सुरुवात करण्यात येईल. चंदगड तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी एका सुसज्ज ट्रामा केअर हॉस्पिटलची गरज होती. ती लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही आमदार राजेश पाटील म्हणाले.
यावेळी तहसीलदार विनोद रनवरे. बीडीओ श्री. बोडरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साने तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके व अधिकारी उपस्थित होते.
Check Also
चंदगडमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये पुन्हा वादाची ठिणगी
Spread the love कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित …