Monday , December 4 2023

श्रीदेव चव्हाटा संस्थेच्यावतीने शेतकरी अवजारांवर कर्ज वाटप

Spread the love

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यांतील शिनोळी येथील श्रीदेव चव्हाटा ब्रम्हलिंग सहकारी संस्थेकडून आज शेतकरी अवजारांवर कर्ज वाटप करण्यात आले.

शिनोळी येथील प्रगतशील शेतकरी यल्लापा रामु पाटील यांना संस्थेकडून उषा कंपनीचे पॉवर ट्रेलरची चावी देताना संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.

कमी कालावधीत संस्थेचा प्रगतीचा चढता आलेख पाहून समाधान वाटल्याचे मत अजित पेट्रोलियमचे मालक अजित खांडेकर यांनी व्यक्त केले. तसेच प्रगतशील यांच्याहस्ते हार घालून पुजा करण्यात आले आहे.

यावेळी शिनोळी बुद्रुकचे शेतकरी मारूती बोकमुरकर, संस्थेचे व्हा. चेअरमन भरमा पाटील, प्रगतशील शेतकरी दुर्गापा रामनकटी, परशराम मनोळकर, निंगापा पाटील, तानाजी खांडेकर, रामु ओऊळकर, वैभव कृषी सेवा केंद्रचे मालक नारायण पाटील, बाळकृष्ण तरवाळ, जोतिबा करटे, बाळू खांडेकर, राहुल मेणसे, संजय पाटील, गुरुप्रसाद तरवाळसह आदी मंडळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कोनेवाडी फाट्यावर कारने दोघांना उडवले; प्राध्यापकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Spread the love  तेऊरवाडी (एस के पाटील) : पर्यटनासाठी जाणाऱ्या चारचाकी कारने बेळगाव – वेंगुर्ला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *